स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल
Swachh Survekshan Results 2023
बेळगाव—belgavkar Swachh Survekshan Results 2023 : स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल जाहीर झाला असून, बेळगाव महापालिकेला यावेळी 198 वे स्थान मिळाले आहे. देशभरातील 446 शहरांमध्ये बेळगावला हे स्थान मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्वच्छ सर्वेक्षणमधील बेळगावची कामगिरी खालावली आहे. गतवर्षी बेळगावला 171 वे स्थान मिळाले होते. गतवर्षीच्या तुलनेत बेळगावचे स्थान 28 अंकांनी घसरले आहे. कर्नाटक राज्यातील 25 नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 7 वे स्थान मिळाले आहे. कर्नाटकातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून बेळगावची ओळख आहे, पण स्वच्छ सर्वेक्षणमध्ये बेळगावला आपले हे स्थान टिकविता आलेले नाही.
Swachh Survekshan Results 2023
स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक सर्व तयारी बेळगाव महापालिकेकडून करण्यात आली होती. यात सिटीझन फीडबॅक हा प्रवर्ग सर्वात महत्त्वाचा असतो, त्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबविली होती. या प्रवर्गातील शंभर टक्के उद्दिष्ट महापालिकेने पूर्ण केले होते, प्रत्यक्षात निकालात बेळगाव मागे पडले आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून मात्र स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगली कामगिरी झाली आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला यावेळी 36 वे स्थान मिळाले आहे. गतवर्षी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला 44 वे स्थान मिळाले होते. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 9500 गुणांपैकी कोणत्या शहराला किती गुण मिळाले यावर स्थान निश्चित करण्यात आले. बेळगाव महापालिकेला 4830 गुण मिळाले, त्याआधारे 198 वे स्थान निश्चित झाले आहे (Swachh Survekshan Results 2023).
स्वच्छ सर्वेक्षण हे केंद्र शासनाचे महत्त्वपूर्ण अभियान आहे. 2017 पासून बेळगाव महापालिकेकडून या अभियानामध्ये सहभाग घेतला जातो. पहिल्या शंभर शहरांमध्ये बेळगावला स्थान मिळावे यासाठी दरवर्षी प्रयत्न केला जातो, पण बेळगाव महापालिकेला एकदाही त्यात यश मिळालेले नाही. हागणदारीमुक्त प्रभाग, घंटागाडी योजनेची यशस्वी अंमलबजावणी, सार्वजनिक स्वछतागृहांची संख्या, त्यांची नियमित स्वच्छता, कचऱ्याची नियमित उचल, ब्लॅक स्पॉटसची संख्या अशा अनेक निकषांच्या आधारे मूल्यमापन की जाते. त्यासाठी केंद्रीय पथक प्रत्येक शहरात पाठविले जाते. यंदा विलंबाने पथक बेळगावात आले होते. सर्व निकषांच्या आधारे माहिती संकलित करण्यात आली होती. पण पहिल्या शंभर शहरांमध्ये स्थान मिळविणे दूर गतवर्षीचे स्थान टिकविणे बेळगाव महापालिकेला शक्य झाले नाही.
Belgaum Swachh Survekshan Results 2023 belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310