अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
Ram Mandir Consecration
Ram Mandir Consecration : उत्तर प्रदेशातील अयोध्येत सध्या श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराचे (Ram Temple) उद्घाटन 22 जानेवारी रोजी होणार आहे. तर 25 जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. दुसरीकडे, अयोध्येतील श्री राम मंदिर (Ram Mandir), सीएम योगी आणि एसटीएफ (STF) प्रमुख यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना एसटीएफने उघडकीस आणली आहे. एसटीएफच्या तपासात समोर आले आहे की, शेतकरी नेता देवेंद्र कुमार तिवारी, ज्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी स्वत: सुरक्षा मिळवण्यासाठी आणि मोठा नेता बनण्यासाठी त्याच्या कर्मचाऱ्यांना धमकीचा मेल पाठवण्यास सांगितले होते. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शेतकरी नेता, त्याचा ड्रायव्हर सुनीत आणि कटात सहभागी असलेला दुसरा युवक प्रभाकर यांचा शोध सुरू आहे (Ram Mandir Aypdhya).
आलमबागचे रहिवासी भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र कुमार तिवारी यांनी UP-112 ला सोशल मिडीया X टॅग करून पोस्ट केली होती. 27 डिसेंबर रोजी झुबेर खान नावाच्या व्यक्तीने त्याच्या ई-मेलवर धमकीचा मेल पाठवल्याचा दावा केला होता. श्री राम मंदिर (Ayodhya Temple), सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख यांना बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत यूपी-112 च्या पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता.
एसटीएफचे डेप्युटी एसपी प्रमेश कुमार शुक्ला यांनी सांगितले की, गोंडाचे रहिवासी तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. देवेंद्र तिवारी यांना सुरक्षा हवी होती, असे तपासात समोर आले. त्यामुळे याप्रकरणाचा एक भाग म्हणून त्याने स्वतःला धमकीचा ई-मेल पाठवला. श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख जोडले गेले जेणेकरून हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत येतील. डेप्युटी एसपींनी सांगितले की, या प्रकरणातील देवेंद्र आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल. देवेंद्र हे एनजीओ गौ सेवा परिषद देखील चालवतात.
देवेंद्रच्या आलमबागच्या पत्त्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्सेस नावाचे कॉलेज आहे. ताहर सिंग कॉलेजच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवतो. ओमप्रकाश हे देवेंद्रचे पीए आहेत. देवेंद्रच्या सांगण्यावरून दोघांनी नाका येथील अमन मोबाईल सेंटरमधून स्वतःच्या पैशातून दोन मोबाईल आणि सिम खरेदी केले. सिममध्ये तहरसिंगचा आयडी वापरण्यात आला होता. यावर ईमेल आयडी तयार करण्यात आला. त्यानंतर देवेंद्रला एक ईमेल पाठवण्यात आला, ज्याचा स्क्रीनशॉट तहरने 19 डिसेंबर रोजी देवेंद्रला WhatsAppवर पाठवला. हा कट बऱ्याच दिवसांपासून सुरू होता, हे स्पष्ट झाले आहे.
एसटीएफच्या म्हणण्यानुसार, ईमेल पाठवल्यानंतर देवेंद्रने मोबाईल जाळून नष्ट केला होता. मात्र मोबाईल नंबर ट्रेस करण्यासोबतच एसटीएफने आयपी अँड्रेसही ट्रेस केला होता, ज्याद्वारे एसटीएफ देवेंद्रच्या ऑफिसमध्ये पोहोचले. कारण त्याच कार्यालयाचे वाय-फाय ई-मेलिंगसाठी वापरले जात होते. अशा प्रकारे संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. गेल्या वर्षभरात देवेंद्रने वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तीन-चार वेळा धमक्या आल्याचा दावा करत एफआयआर दाखल केला होता. कोणत्याही प्रकरणाचा तपास लागला नाही. या प्रकरणालाही गती मिळाली नाही. त्यामुळे यावेळी त्यांनी श्री राम मंदिरासह मुख्यमंत्री आणि एसटीएफ प्रमुखांची नावे जोडली. पण, यावेळी तो स्वतःच पकडला गेला. या प्रकरणात शांतता बिघडवणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे अशा कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आरोपींनी दोन ई-मेल आयडी वापरल्याचे एसटीएफच्या तपासात समोर आले आहे. एक आयडी आलम अन्सारी खान आणि दुसरा जुबेर खानच्या नावाचा होता. दोन्ही ई-मेल एकाच मोबाईलवर तयार करण्यात आले होते आणि देवेंद्रच्या ऑफिसच्या वाय-फायवरून इंटरनेटचा वापर करण्यात आला होता. 15 डिसेंबर रोजी आलमबाग पोलिस ठाण्यात दाखल झालेला गुन्हाही उघड झाला. ते मेलही त्या दोघांनी देवेंद्रच्या सांगण्यावरून केले होते.
अटकेत असलेले आरोपी :
– तहरसिंग, धनेपूर गोंडा
– ओमप्रकाश मिश्रा, कटरा गोंडा
सूत्रधार : देवेंद्र कुमार तिवारी फरार. सुमित आणि प्रभाकर हे देखील फरार झाले आहेत.
The Ram Mandir is a Hindu temple that is under construction in Ayodhya, Uttar Pradesh, India. It is located at the site of Ram Janmabhoomi, the hypothesized birthplace of Rama, a principal deity of Hinduism
The temple is being built in the Nagara style of temple architecture and the idol of Ram Lalla will be placed in the sanctum sanctorum
We all know that the Ram Temple will be inaugurated on January 22, 2024. Preparations are on in full swing for this auspicious day
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements