प्राध्यापकाच्या पोस्टनंतर प्रचंड खळबळ; आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष, पण…
separate homeland’ for Muslims : मुस्लीम समाजासाठी स्वंतत्र भूमी द्या अशी मागणी करणाऱ्या एका सहाय्यक प्राध्यापकाविरोधात बिहारच्या पाटण्यात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. खुर्शीद आलम असं या सहाय्यक प्राध्यापकाचं नाव असून विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे (Bihar professor lands in trouble for ‘separate homeland’ for Muslims) .
“संयुक्त पाकिस्तान आणि बांगलादेश झिंदाबाद”, असं खुर्शीद आलम यांनी त्यांच्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तर, दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय मुस्लिमांना पाकिस्तान आणि बांगलादेश शेजारील स्वंतत्र मातृभूमी हवी आहे, असं म्हटलं आहे. खुर्शीद आलम हे पाटण्यातील नारायण कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. हे प्रकरण चिघळल्यानंतर त्यांनी आपल्या सहाय्यक प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, याप्रकरणी वाद वाढल्यानंतर खुर्शीद आलम यांनी माफीही मागितली. माझ्या पोस्टद्वारे मी कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही. किंवा तसा हेतुही नाही. जर या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मी याबद्दल माफी मातो, अशी माफी मागणारी पोस्टही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
विद्यापीठाकडून कारणे दाखवा नोटीस : आलमच्या पोस्ट्सविरोधात जनक्षोप उसळल्यानंतर विद्यापीठ प्रशासाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न नोटीशीद्वारे विचारण्यात आला आहे.
सिवानचे एसपी शैलेश कुमार सिन्हा म्हणाले, आलमने केवळ आपल्या भावना पोस्टद्वारे व्यक्त केल्या होत्या. तरीही याविरोधात तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. तसंच, तपास सुरू करण्यात आला आहे. “आपली राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. परंतु, भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची घोषणा केली आहे. देश सर्व धर्मांप्रती तटस्थ नाही. न्यायालयांचे निकालही पक्षपाती असतात, अशी प्रतिक्रिया आलम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली होती.
दरम्यान, संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पेसमध्ये निदर्शने करत आलमवर कारवाईची मागणी केली. त्यांचा पुतळाही जाळला आणि सहाय्यक प्राध्यापकाला हटवले नाही तर लेक्चर्सवर बहिष्कार घालण्याची धमकी विद्यार्थ्यांनी दिली आहे.
separate homeland’ for Muslims
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements