केरळ : सामान्यतः कोणत्याही न्यायालयीन कार्यवाहीबद्दल आपण ऐकतो तेव्हा कोणत्याही गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा मृत्युदंडाची शिक्षा दिल्याचे ऐकू येते. पण, केरळच्या मांजेरी येथील जलदगती विशेष न्यायालयाने एका आरोपीला सर्वात भयंकर अशी शिक्षा सुनावली आहे. 10, 15 किंवा 20 वर्ष नाही तर या न्यायालयाने त्या आरोपीला तब्बल 123 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. इतकेच नव्हे तर न्यायालयाने आरोपीला ₹ साडे आठ लाखांचा दंडही ठोठावलाय. न्यायालयाने इतकी भयंकर शिक्षा देण्याइतका त्याने केलेला गुन्हाही तितकाच क्रूर होता (Kerala court sentences man to cumulative 123 yrs for rape of minor daughter).
केरळमधील मलप्पुरम येथे रणारा हा आरोपी आहे. त्या आरोपीवर आपल्या दोन लहानग्या मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली न्यायालयाने त्याला 123 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मांजेरीच्या जलदगती विशेष न्यायालयाने दोषी आरोपीला हा शिक्षेचा निकाल दिला आहे. 2021 वर्षाच्या अखेरीस घडलेली ही घटना आहे. आरोपीने वासनेच्या भरात आपल्या 11 आणि 12 वर्षाच्या दोन्ही मुलींवर आळीपाळीने अत्याचार केला. काही दिवसांनी मुलींच्या पोटात दुखू लागले. कुटुंबीयांनी त्या मुलींची आरोग्य तपासणी केली असता त्यातून त्यांच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघडकीस आली.
कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस तपासात मुलींनी वडिलांचे नाव घेतले. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली. या खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यावर न्यायालयाने निर्णय दिला. न्यायालयाने आरोपीला त्याच्या या घृणास्पद कृत्यासाठी जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा सुनावली नाही. तर, त्याला तब्बल 123 वर्षांचा तुरुंगवास आणि साडे आठ लाख रुपयांचा दंड अशी जबरी शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दोन मुलींच्या प्रकरणात दोन वेगवेगळे खटले चालविले. या दोन्ही खटल्यात आरोपींना दोषी ठरविताना न्यायालयाने ही कठोर शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने आरोपीला साडेआठ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणाची जलदगती पातळीवर सुनावणी घेताना न्यायालयाने पुरावे आणि पुराव्यांच्या आधारे वडिलांना दोषी ठरवले.
sentences man to cumulative 123 yrs
sentences man to cumulative 123 yrs
sentences man to cumulative 123 yrs
sentences man to cumulative 123 yrs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements