स्क्रॅप माफिया रवी नागर उर्फ रवी काणा
seal ₹70 crore bungalow : नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात गुन्हेगारी कृत्यं करुन दहशत निर्माण करणाऱ्या रवी नागर उर्फ रवी कामासह त्याच्या टोळीविरोधात गँगस्टर कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी स्क्रॅप माफिया रवी नागर आणि त्याच्या टोळीशी संबंधित 200 कोटींची मालमत्ता सील केली आहे.
रवी नागरनं त्याची प्रेयसी काजल झा (Kajal Jha) हिला दक्षिण दिल्लीत एक बंगला गिफ्ट केला होता. तो बंगलादेखील पोलिसांनी सील केला आहे. त्याची किंमत 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. काजलनं नोकरीसाठी रवी नागरला संपर्क केला होता. पण अल्पावधीच ती त्याच्या टोळीत सामील झाली. रवीच्या बेनामी मालमत्तांचा, संपत्तीचा हिशोब ठेवण्याचं काम तिच्याकडे होतं. काजल ही रवी नागरच्या अतिशय जवळची होती. त्यामुळेच रवीनं तिला दिल्लीच्या उच्चभ्रू परिसरात महागडा बंगला गिफ्ट केला होता. न्यू फ्रेंड्स कॉलनीतील काजलच्या बंगल्याचं बाजारमूल्य 100 कोटी रुपयांच्या घरात आहे.
रवीच्या सगळ्या व्यवसायाचा हिशोब काजलकडे होता. हळूहळू तिनंदेखील गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं. दिल्ली-एनसीआरमध्ये ती लेडी डॉन म्हणून ओळखली जायची. पोलिसांनी बुधवारी रवीच्या मालमत्तांवर छापे टाकले. त्यावेळी काजल झा आणि तिच्या साथीदारांनी पळ काढला. पोलिसांनी काजल झाचा बंगला सील केला आहे. माहितीनुसार, रवींद्र नागर 16 जणांची टोळी चालवतो. स्क्रॅपमध्ये गेलेल्या वस्तूंची अवैध खरेदी विक्री करायचं काम तो करतो. दिल्ली-एनसीआरमधील व्यावसायिकांकडून जबरदस्तीनं वसुली करुन त्यानं कोट्यवधी कमावले. रवीचा भाऊ हरेंद्र प्रधान गँगस्टर होता. 2014 मध्ये एका टोळीनं हरेंद्रची हत्या केली. त्यानंतर रवीनं टोळी चालवली.
Noida cops seal ₹70 crore South Delhi bungalow linked to gangster’s girlfriend
seal ₹70 crore bungalow
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements