Satish Sugars Classic Body Building Championship
बेळगाव—belgavkar : इंडियन बॉडी बिल्डिंग संघटना, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी अन्नोत्सव निमित्त 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत हरियाणाच्या नितीन चंडिलाने (Nitin Chandila) आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर सतीश शुगर्स क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब पटकाविला (Satish Sugars : Mr. Satish Sugars Classic Body Building Championship.. पहिला उपविजेता व उत्कृष्ट पोझर रेल्वेचा सरबोसिंग तर दुसरा उपविजेता कर्नाटकच्या धनराजने विजेतेपद पटकाविले. 280 गुणांसह महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद पटकाविले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे :
55 किलो गट : 1. संतोष यादव (महाराष्ट्र), 2. आर. गोपालकृष्णन (तामिळनाडू), 3. अरुण पाटील (महाराष्ट्र), 4. रमेश जाधव (महाराष्ट्र), 5. जितेंद्र सिंग (उत्तर प्रदेश)
60 किलो गट : 1. नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), 2. अवनिश पाटील (महाराष्ट्र), 3. विकास मोंडल (प. बंगाल), 4. विग्नेश टी. व्ही. (तामिळनाडू), 5. रजन कारापुरकर (गोवा)
65 किलो गट : 1. काशर अली (आसाम), 2. बिपीन नखुलदाद (महाराष्ट्र), 3.वैभव महाजन (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन), 4. जयप्रकाश थंगादुराई (तामिळनाडू), 5. अक्षर आर. (कर्नाटक)
70 किलो गट : 1. पंचाक्षरी लोनार (महाराष्ट्र), 2. प्रतिक पांचाळ (रेल्वे), 3. प्रताप कालकुंद्रीकर (कर्नाटक), 4. जी. भास्कर राव (आंध्रप्रदेश), 5. मोहीद खलीद (तेलंगणा)
75 किलो गट : 1. रक्षित कोटीयान (रेल्वे), 2. आर. शशीकांत (कर्नाटक), 3. टी. रामकृष्ण (रेल्वे. 4. हॅपी (पंजाब. 5. बिस्वजीत थापा (प. बंगाल)
80 किलो गट : 1. धनराज (कर्नाटक), 2. चिंदा राहुल (रेल्वे), 3. प्रशांत खन्नुकर (कर्नाटक), 4. एन. पादियान (तामिळनाडू), 5. रोहन धुरी (महाराष्ट्र)
85 किलो गट : 1. एन. सरबो सिंग (रेल्वे), 2. आशुतोष सहा (महाराष्ट्र), 3. सर्वणन मानी (तामिळनाडू), 4. देबमाल्या मल्लिक (प. बंगाल), 5. अक्षय कृष्णा व्ही. (केरळ)
90 किलो गट : 1. मंजुनाथ एस. (कर्नाटक), 2. देवेंद्र पाल (उत्तर प्रदेश), 3. चेतन नाईक (महाराष्ट्र), 4. शुनमुगेश (तामिळनाडू), 5. गौतम (कर्नाटक)
90-100 किलो गट : 1. आर. कार्तिकेश्वर (सेंट्रल रेव्हेन्यू), 2. प्रशांत कुमार सिंग (झारखंड), 3. प्रदीप ठाकुर (मध्यप्रदेश), 4. अश्वथ सुजन (कर्नाटक), 5. निलकंठ सवाशे (महाराष्ट्र)
100 किलो वरील : 1. नितीन चंडिला (हरियाणा), 2. निलेश दगडे (महाराष्ट्र), 3. जयकुमार व्ही. (रेल्वे), 4. मनोज अग्निहोत्री (उत्तर प्रदेश), 5. अन्मोल तिवारी (मध्यप्रदेश)
यांनी विजेतेपद पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे 50 हजार, 40 हजार, 30 हजार, 25 हजार व 20 हजार रुपये अशी रोख, पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर सतीश शुगर्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताबासाठी संतोष यादव, नितीन म्हात्रे, काशीर अली, पंचाक्षरी, रक्षित कोटीयान, धनराज, सरबोसिंग, मंजुनाथ कार्तिकेश्वर, नितीन चंडिला यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नितीन चंडिला, सरबोसिंग, धनराज यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्याच्यात आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर हरियाणाच्या चेतन चंडिलाने बाजी मारत सतीश शुगर्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा मानाचा किताब पटकाविला.
पहिले उपविजेतेपद व उत्कृष्ट पोझर रेल्वेच्या सरबो सिंग तर दुसरा उपविजेता 280 गुणासह महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद पटकाविले. प्रमुख पाहुणे राहुल जारकीहोळी, आमदार राजू सेठ, अविनाश पोतदार, शिरीष गोगटे, जयदीप सिद्दण्णवर, चेतन पाठारे, प्रेमचंद डिग्रा, हिरल शेठ, अजित सिद्दण्णवर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या नितीन चंडिला याला 3 लाख 50 हजार रुपये रोख, चषक, प्रमाणपत्र, पहिल्या उपविजेत्या सरबो सिंगला 1 लाख 50 हजार रुपये व चषक, तर दुसऱ्या उपविजेत्या धनराजला 1 लाख रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. तर महाराष्ट्र संघाला 25 हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.
Satish Sugars Classic
Satish Sugars Classic Body Building Championship
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements