रुग्णांसाठी ‘राम किट’ ठरणार वरदान
Ram Kit for Heart Attack : हृदयाचे आजार असलेल्या रुग्णासांठी इमर्जन्सीमध्ये उपयोगी पडावे यासाठी ‘राम किट’ (Ram Kit) बनवण्यात आले आहे. या किटवर भगवान रामाच्या फोटोसोबत ‘आम्ही उपचार करतो, तो बरा करतो’ असे लिहिण्यात आले आहे. या किटमध्ये अत्यावश्यक औषधे आणि रुग्णालयांचे हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आहेत.
राम किटमध्ये तीन आवश्यक औषधे आहेत – इकोस्प्रिन (Ecosprin), रोसुव्हस्टेटिन (Rosuvastatin – कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी) आणि सॉर्बिट्रेट (Sorbitrate). ही औषधे हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येकास त्वरित आराम देतात. हिवाळ्यात हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढत असल्याने राम किट उपयुक्त ठरतात. थंडीच्या दिवसात हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढल्याने हे राम किट यूजफुल ठरणार आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड कार्डियाक सर्जरीने हृदयरोग्यांसाठी हे ‘राम किट’ तयार करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील पहिले रुग्णालय म्हणून प्रयागराज येथील कॅन्ट हॉस्पिटल 13 जानेवारीपासून शहरातील 5 हजार घरांना ‘राम किट’ देणार आहे.
राम किट नाव का? आणि किंमत किती?
‘राम किट’चे नाव प्रभू राम यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, कारण प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो. या किटमध्ये रक्त पातळ करण्यासाठी, हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज उघडण्यासाठी आणि हृदयविकारांचा त्रास असणाऱ्यांना आराम देण्यासाठी जीवनरक्षक औषधे देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या किटची किंमत फक्त 7 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. हे किट गरिबांचा विचार करून तयार करण्यात आले आहे (Rs 7 Ram Kit for heart attack preventing).
हे किट कसे काम करते? : हृदयविकाराचा झटका आल्यास रुग्णांना दिल्या जाणाऱ्या या तीन औषधांचा या किटमध्ये समावेश आहे. जर एखाद्याला हृदयविकाराचा झटका किंवा छातीत दुखत असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी हे औषध घरी घेतल्यास धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मात्र, छातीत दुखत असल्यास केवळ किटवर अवलंबून न राहण्याची आणि घरीच बसून न राहाण्याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.. किट मागिल हेतू हा नागरिकांचा जीव वाचवणे हा आहे.
Ram Kit : Rs 7 heart attack preventing golden dose every home should have
Now, a ‘Ram kit’ to save the lives of heart patients | Kanpur
Disclaimer: वर दिलेली माहिती वापरून पाहण्याआधी वाचकांनी डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आम्ही या माहितीबद्दल कुठलाही दावा करत नाही.
Rs 7 Ram Kit for heart attack preventing
Rs 7 Ram Kit for heart attack preventing
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements