बेळगाव—belgavkar : बेळगाव महापालिका आयुक्तपदी राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी जैनापुरे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करून त्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याची सूचना दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे नियुक्ती आदेश मिळताच जैनापुरे यांनी पदभार स्वीकारलायं.
लोकसभा निवडणूक होईपर्यंत आता जैनापुरे याच महापालिका आयुक्त म्हणून कामकाज पाहतील, अशी शक्यता आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची १ फेब्रुवारी रोजी बदली झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, त्यात दुडगुंटी यांचे नाव अग्रक्रमावर होते. रायचूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी या पदावर दुडगुंटी यांची नियुक्ती झाली आहे, पण त्यावेळी महापालिका आयुक्तपदी कोणाचीच नियुक्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुडगुंटी यांनी पदभार सोडला नव्हता.
गेल्या आठवड्यात आयुक्त दिल्ली दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता सिद्धगोंडा यांच्याकडे पदभार दिला होता. त्यामुळे दुडगुंटी महापालिका आयुक्तपद लवकर सोडणार नाहीत, अशीच चर्चा सुरू होती. मात्र, रायचूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरपणे घेत अप्पर जिल्हाधिकारीपदी रुजू होण्याबाबतचे पत्र दुडगुंटी यांना पाठविले.
बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनाही याबाबतची माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जैनापुरे यांची महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली. जैनापुरे यांनी बेळगावच्या प्रांताधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. महापालिकेतही त्यांनी कौन्सिल सेक्रेटरी या पदावर काही काळ सेवा बजावली आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव त्यांना आहे. त्याचा फायदा जैनापुरे यांना होणार आहे.
Rajshree Jainapure as Belgaum Municipal Commissioner belgav belagavi belgavkar explore digital india
Rajshree Jainapure as Belgaum Municipal Commissioner
Rajshree Jainapure as Belgaum Municipal Commissioner
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements