राजस्थान : गेल्या महिनाभरात दोनदा सोन्याचा ‘खजिना’ सापडला आहे. आयकर विभागाच्या कारवाईदरम्यान हा सोन्याचा खजिना पाहून अधिकारीही चकीत झाले. पहिला खजिना जोधपूर विभागात 17 डिसेंबर रोजी सापडला होता, तर दुसरा खजिना 7 जानेवारी रोजी सापडला. दरम्यान, हा खरा खजिना नसून, आयकर विभागाच्या छापेमारीत सापडलेले सोने आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी जोधपूर आणि पाली येथील तीन व्यावसायिक समूहांवर छापे टाकले होते. त्या छाप्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर काळा पैसा सापडला होता. त्यावेळी प्राप्तिकर विभागाने 52 कोटी रुपयांचे दागिने आणि सुमारे 400 कोटी रुपयांची व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली आहेत (Rajasthan Income Tax Raid).
या कारवाईदरम्यान विभागाने पाली येथील गुगड ग्रुपकडून 226 कोटी रुपये, उमा पॉलिमर्स ग्रुपच्या जागेतून 50 कोटी रुपये, पीजी फॉइल्स ग्रुपकडून 50 कोटी रुपये आणि शाह यांच्याकडून 150 कोटी रुपयांची व्यावसायिक कागदपत्रे जप्त केली. आयकर विभागाला एकट्या शाह बंधूंच्या ठिकाणांतून 25 कोटींहून अधिक किमतीचे दागिने सापडले आहेत. तर गुगडच्या अड्ड्यावरून 20 कोटींचे दागिने सापडले आहेत.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात आयकर विभागाच्या पथकांनी उदयपूरमधील हॉटेल व्यावसायिकांवर छापे टाकले. या कारवाईत सुमारे 9 किलो सोन्याचे दागिने आणि 3.30 कोटी रुपयांचा काळा पैसा सापडल्याने आयकर विभागाला धक्का बसला. येथे सापडलेल्या दागिन्यांची किंमत 5.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. या कारवाईत आयटी अधिकाऱ्यांनी 150 कोटींहून अधिक किमतीच्या काळ्या व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. यावेळी फतेह ग्रुप, रॉकवुड आणि एडीएम ग्रुपच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली.
Rajasthan Income Tax Raid
Rajasthan Income Tax Raid
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements