आमदार रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ
ED raids firms linked to MLA Rohit Pawar of Sharad Pawar camp पुणे : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर Enforcement Directorate (ED) ने सकाळीच छापेमारी केली आहे. एक दोन नव्हे तर बारामती अॅग्रोच्या 6 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. सहा तासांपासून ईडीचे अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे (Baramati Agro Pvt. Ltd.).
रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचं बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. The Enforcement Directorate (ED) is conducting searches at six locations in connection with an alleged money laundering case linked to the fraud caused to Maharashtra State Cooperative (MSC) Bank. The searches include Baramati Agro Pvt. Ltd. in Pune and Pimpri-Chinchwad, a firm linked to NCP MLA Rohit Pawar, the grand nephew of Sharad Pawar.
विशेष म्हणजे रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. असं असतानाही ईडीने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून या छापेमारीवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रोहित पवार हे परदेशात गेलेले आहेत. ते परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली आहे. छापेमारी झाल्याचं कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. सध्या रोहित पवार यांच्या या ट्विटची चर्चा सुरू आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर या कंपन्यांच्या सहा ठिकाणच्या कार्यालयावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता ही छापेमारी करण्यात आली. सात तास झाले तरी अजूनही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीत झाडाझडती सुरू आहे. पुणे, बारामती, पिंपळी आणि संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. बँकेचा तपशीलही तपासला जात असून संगणकातील फोल्डरही पाहिले जात आहेत.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements