YouTube इंडियाला पॉक्सोचं उल्लंघन केल्याबद्दल पाठवली नोटीस
व्हिडिओंचं व्यावसायीकरण करणे म्हणजे पॉर्नला चालना देणं
YouTube India Notice : व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतातील युनिटसमोर मोठ्या अडचणी आल्या आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (National Commission for Protection of Child Rights (NCPCR)) चक्क पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत यूट्यूब इंडियाला नोटीस पाठवली आहे.
एनसीपीसीआरचे प्रमुख प्रियंक कानूनगो यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की यूट्यूबवर सध्या असे हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आई आणि (अल्पवयीन) मुलगा एकमेकांना लिपलॉक किस करत आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिओंचं व्यावसायीकरण करणे म्हणजे पॉर्नला चालना देणं आहे. त्यामुळेच यूट्यूबला नोटीस पाठवण्यात आली आहे.
“अशा प्रकारच्या व्हिडिओंच्या माध्यमातून लहान मुलांना अब्यूज केलं जातं. अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ हे किशोरवयीन मुलांमधील उत्तेजनांना चालना देत आहे. भारतात हे चालणार नाही. यूट्यूबला यावर कारवाई करावीच लागेल”, असंही प्रियंक पुढे म्हणाले.
आई आणि मुलाचं नातं अगदी पवित्र आहे. मात्र, अशा प्रकारच्या व्हिडिओंमध्ये या नात्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. हे स्पष्टपणे या लहान मुलांचं लैंगिक शोषण आहे. जर हे प्रकार थांबले नाहीत, तर NCPCR याप्रकरणी FIR देखील दाखल करेल. पुढे मग यूट्यूब इंडियाच्या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवलं जाईल याचीही खबरदारी आम्ही घेऊ; असंही प्रियंक यांनी खडसावून सांगितलं.
NCPCR raises concern over ‘indecent content’ involving mothers, children on YouTube
YouTube India official summoned over ‘indecent’ content involving mothers, sons
NCPCR Summons YouTube India Featuring Mother-Son
NCPCR Summons YouTube India Featuring Mother-Son
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements