National Creators Awards for influencers
अरेरे….! कसले व्हिडीओ बनवत असतोस, याने काय मिळणार आहे? एकेकाळी अशा प्रश्नांनी वेढलेला ऑनलाईन क्रिएटर्सचा समुदाय आता सेलिब्रिटीज म्हणून नावारूपाला आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची समाजात बदल घडवून आणण्याची शक्ती अफाट आहे. या शक्तीचा सदुपयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता माय जीओव्ही इंडियाने (MyGov India) भारताच्या डिजिटल क्रिएटर्ससाठी विशेष पुरस्कारांची घोषणा केली आहे. खाली तपशीलवार दिलेल्या 20 श्रेणींमधील इन्फ्लुएन्सर्सना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे (National Creators Awards for influencers).
केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या सूचनेत म्हटल्याप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच डिजिटल क्रिएटर्सच्या शक्तीला मान्य करून त्यांना नवनवीन विषयांवर भाष्य करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, या पुरस्कारांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा यांना जगासमोर आणणाऱ्या चेहऱ्यांना गौरवले जाईल तसेच यातून अन्य कलाकारांना सुद्धा समाजात परिवर्तनाचे काम करण्याची प्रेरणा मिळेल अशा हेतूने हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जाणार आहे. आपणही या सोहळ्यातील पुरस्काराच्या 20 श्रेणी कोणत्या याविषयी जाणून घेऊया (Click here : National Creators Awards for influencers).
सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार — : — असा क्रिएटर ज्याने भारतीय संस्कृतीविषयी कथेच्या माध्यमातून कल्पक रित्या माहिती दिली आहे
द डिसप्टर ऑफ द इयर — : — असा क्रिएटर ज्याने आपल्या कॉन्टेन्टमधून त्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत
सेलिब्रेटी क्रिएटर ऑफ द इयर — : — असा क्रिएटर ज्याने आपल्या मोठ्या संख्येतील फॉलोअर्सना मार्गदर्शन करून आपल्या कॉन्टेन्टमधून समाजात सकारात्मकता पसरवण्यास मदत केली आहे
ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड — : — पर्यावरणासाठी काम करणाऱ्या क्रिएटरला हा पुरस्कार देण्यात येईल
सामाजिक बदल घडवणारा सर्वोत्कृष्ट क्रिएटर — : — समाजकार्यात अग्रेसर क्रिएटरला या पुरस्काराने गौरवण्यात येईल
कृषी क्षेत्रातील प्रभावशाली क्रिएटर — : — कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त नवनवीन माहिती देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल
कल्चरल अम्बॅसेडर ऑफ द इयर — : — भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंना उजेडात आणून संस्कृतीचा प्रचार करण्यास मदत करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल
आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्कार — : — भारताची संस्कृती जगभरात पोहोचवण्यासाठी परदेशात राहून काम करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल
पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट क्रिएटर पुरस्कार — : — भारतातील पर्यटनाला चालना देणारा कॉन्टेन्ट तयार करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
स्वच्छता दूत पुरस्कार — : — स्वच्छतेवर आधारित कॉन्टेन्टचा सन्मान केला जाईल.
द न्यू इंडिया चॅम्पियन पुरस्कार — : — भारताची प्रगती, विकास तसेच सरकारी धोरणांबद्दल जागरूकता पसरवणारे आणि राष्ट्र उभारणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल.
टेक क्रिएटर पुरस्कार — : — नवीन उपकरणे, तंत्रज्ञान याविषयी माहिती देणाऱ्या, प्रश्न सोडवणाऱ्या क्रिएटरचा सन्मान होईल
हेरिटेज फॅशन आयकॉन पुरस्कार — : — स्थानिक कपड्यांच्या ब्रँडचा तसेच कलेचा प्रचार करणाऱ्या क्रिएटरला सन्मानित केले जाईल.
मोस्ट क्रिएटिव्ह क्रिएटर (पुरुष आणि महिला) — : — मनोरंजन व सामाजिक जाणीव या दोन्ही पैलूंनी समृद्ध कॉन्टेन्ट बनवणाऱ्या पुरुष व स्त्री क्रिएटरचा या पुरस्काराने सन्मान केला जाईल
खाद्य श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर — : — भारतीय पाककलेची माहिती देणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
शिक्षण श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर — : — शिक्षणाची ऑनलाईन सामग्री उपलब्ध करून देणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
गेमिंग श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिएटर — : — गेमप्ले, रिव्ह्यू किंवा समालोचनाद्वारे, खेळांविषयी माहिती देणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटर — : — ठराविक प्रेक्षक असूनही, एखाद्या महत्त्वाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणाऱ्या क्रिएटरला या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
सर्वोत्कृष्ट नॅनो क्रिएटर — : — प्रेक्षकांशी परस्परसंवाद आणि वैयक्तिक नाती जोडून मार्गदर्शन करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस क्रिएटर — : — आरोग्य, निरोगीपणा आणि फिटनेसचा प्रचार करणाऱ्या क्रिएटरचा सन्मान केला जाईल.
कसे निवडले जातील विजेते? — : — निवड प्रक्रियेमध्ये नामांकनाचा टप्पा, नामांकनांचे स्क्रीनिंग (निवड), त्यानंतर सार्वजनिक मतदान आणि निवड समिती (ज्युरी) द्वारे रिव्ह्यू या टप्प्यांचा समावेश आहे. ज्युरी आणि सार्वजनिक मतांच्या एकत्रित गुणांच्या आधारावर विजेत्यांची घोषणा केली जाईल. दरम्यान, MyGov India तर्फे, सर्व डिजिटल क्रिएटर्स, आणि बदल घडवू पाहणाऱ्यांना भारतामधील डिजिटल प्रगतीला साजरे करण्यासाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
National Creators Awards for influencers
National Creators Awards for influencers
National Creators Awards for influencers
National Creators Awards for influencers
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements