Hookah Video व्हायरल झाल्यानंतर इंटरनेटवरील वातावरण गरम
MS Dhoni Smoking Hookah Video, Viral Video Shows MS Dhoni Smoking Hookah : महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर धमाकेदार खेळीसाठी आणि मैदानाबाहेर साधे जीवनसरळ जीवण जगण्यासाठी ओळखला जातो. धोनीने त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये पाळीव प्राण्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे दिसत होते. त्यावेळी सर्वांनी माहीचे कौतुक केले. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार ‘हुक्का’ ओढताना दिसत आहे. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर कॉमेंटचा पाऊस पडला आहे (Hookah Video). अनेकांनी धोनीला ट्रोल केले आहे.
चाहत्यांना बसला धक्का : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात तो हुक्का ओढताना दिसत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवरील वातावरण गरम झाले आहे. युजर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे तर काहींनी बचाव केला आहे. माही गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, त्याचा हुक्का ओढतानाचा ताज्या व्हिडिओने चाहत्यांना धक्काच बसला आहे. व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या स्टाइलिश लांब केसांसह एक औपचारिक सूट परिधान केलेला दिसत आहे. त्याच्यासोबत इतर काही जणांचा गटही आहे. धोनीच्या तोंडातून धूर निघत आहे.
Herbal shisha hay! It's good for health and contains no tobacco 👍🏼
Stop trolling MS Dhoni! He's a legend. Rival fans should stay away from Mahi ❌ pic.twitter.com/F1SjaEY7ya
— Farid Khan (@_FaridKhan) January 6, 2024
जॉर्ज बेली याने केला होता खुलासा
माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू जॉर्ज बेलीने एकदा खुलासा केला होता की एमएस धोनी तरुणांसोबत संबंध निर्माण करण्यासाठी हुक्का सेशन करायचा. बेली हा 2009 ते 2012 दरम्यान CSK संघाचा भाग होता आणि 2016 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचाही भाग होता. यावर यूजरकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले की, “माही की मर्जी.” दुसऱ्याने लिहिले, “आयपीएल विजयाच्या आनंदात आतापासून पार्टी.” अनेक युजरने धोनीला ट्रोल केले आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किग्सने विजेतेपद मिळाले होते. धोनीच्या नेतृत्वात पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद सीएसकेला मिळाले. संपूर्ण आयपीएलमध्ये धोनीच्या टीमने चांगली खेळी केली.
MS Dhoni Smoking Hookah Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements