लष्करी आणि व्यावसायिक विमाने उतरवता येणार
Minicoy Island : मालदीवने विनाकारण उकरून काढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्या देशाला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने दळणवळण यंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आगामी काळात मिनिकॉय बेटावर नवीन विमानतळ उभारले जाणार आहे (Minicoy, locally known as Maliku, is an island in Lakshadweep, India)
मिनिकॉय विमानतळावर लष्करी आणि व्यावसायिक विमाने उतरू शकतील, असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विमानतळ उभारले जाणार आहे. हे विमानतळ उभारण्यात आले तर हवाई दलाला मालदीवसोबतच हिंद महासागरातील हालचालींवर देखील लक्ष ठेवता येईल. सध्या या विमानतळाच्या उभारणीचा प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित आहे.
येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यावसायिक विमाने उतरतील, अशा पद्धतीने येथे सोयी सुविधांचा विकास केला जाईल. या प्रस्तावित मिनिकॉय विमानतळामुळे हवाई दल तसेच नौदलाला अरबी समुद्रात संचलन करता येणार आहे. अलीकडील काळात समुद्री चाच्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. या विमानतळामुळे त्याला लगाम तर बसेलच पण चीनच्या सागरी हालचालींवरही त्यामुळे लक्ष ठेवता येणार आहे.
Minicoy Island
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements