Maruti ने सादर केली ‘फ्लाइंग कार’ कॉन्सेप्ट
भारतात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलसोबत केवळ हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारच रस्त्यावर पाहायला मिळत होत्या. पण, आता लवकरच आपल्याला हवेत उडणाऱ्या फ्लाइंग कारही पाहायला मिळणार आहेत. देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी व्हायब्रंट गुजरातमध्ये फ्लाइंग कारचे कॉन्सेप्ट मॉडेल शोकेस केले. यासोबतच कंपनीने आपल्या आगामी इलेक्ट्रिक कार ईव्हीएक्सचे कॉन्सेप्ट मॉडेलही प्रदर्शित केले.
Maruti Suzuki flying car
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायब्रंट गुजरातमध्ये दाखवण्यात आलेल्या मारुतीच्या फ्लाइंग आणि ईव्हीएक्स इलेक्ट्रिक कारची ही पाहणी केली. मारुती सुझुकी इंडियाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली अपडेटेड प्रोटोटाइप इलेक्ट्रिक कार ईव्हीएक्स देखील प्रदर्शित केली होती. याशिवाय 29-31 ऑक्टोबर 2023 रोजी टोकियो येथे झालेल्या जपान मोबिलिटी शोमध्ये सुझुकीने ही ईव्हीएक्स सादर केली होती. विशेष म्हणजे Maruti Suzuki इंडियाने भारतात फ्लाइंग कार सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करत व्हायब्रंट गुजरातमध्ये फ्लाइंग कारचे कॉन्सेप्ट मॉडेल देखील प्रदर्शित केले.
भारतात फ्लाइंग कार सेवा सुरू (Maruti Suzuki flying car) करण्याच्या उद्देशाने कंपनीने जपानी स्टार्टअप स्कायड्राइव्हसोबत भागीदारी करून ‘स्कायकार’ हे मल्टी रोटर विमान विकसित केले आहे. स्कायकार संकल्पनेत शहरी भागासाठी जेथे विमानतळ बांधणे कठीण जाऊ शकते, तेथे ऑल-इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सेवा सुरु करण्याची कल्पना मांडणयात आली आहे. प्रोटोटाइप दाखवल्याप्रमाणे, स्कायकार इमारतींच्या छतावर उड्डाण आणि लँडिंग करू शकते.
मारुती ईव्हीएक्समध्ये ऑल इलेक्ट्रिक एसयूव्ही कॉन्सेप्टचा समावेश करण्यात आला आहे. अपडेटेड प्रोटोटाइप ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित केलेल्या मागील एडिशनपेक्षा अनेक लहान अपडेट देण्यात आले आहेत. मारुती सुझुकी ईव्हीएक्स चा आकार ग्रँड विटारा एसयूव्ही इतकाच असेल, ज्याची लांबी 4,300 मिमी असेल. अपडेटेड प्रोटोटाइप पाहाता ही कार उत्पादनाच्या टप्प्यात येत असल्याचे संकेत मिळत आहेत आणि याचे डिझाईन हे कॉन्सेप्ट मॉडेलसारखेच असेल.
मारुती ईव्हीएक्सची किंमत काय असेल?
भारतात टेस्टिंग दरम्यान मारुती ईव्हीएक्स पुन्हा एकदा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी ही गाडी चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग करताना दिसली आहे. मारुती ईव्हीएक्स एप्रिल 2025 पर्यंत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मारुती ईव्हीएक्सची किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, असा अंदाज आहे. ही 5 सीटर कार आहे, ज्यात पाच प्रवासी बसू शकतात.
मारुती ईव्हीएक्स इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 60 किलोवॅट बॅटरी पॅकसह ड्युअल मोटर सेटअप देण्यात येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हे वाहन 550 किलोमीटरची रेंज पार करण्यास सक्षम असेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये मोठा कनेक्टेड स्क्रीन सेटअप, वायरलेस फोन चार्जिंग आणि 360 डिग्री कॅमेरा असे फीचर्स दिले जाऊ शकतात. लाँच झाल्यानंतर ही कार ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक आणि एमजी झेडएस ईव्हीला टक्कर देईल. महिंद्रा एक्सयूव्ही 400 ईव्ही आणि टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकपेक्षा हा अधिक प्रीमियम ऑप्शन असेल. Maruti Suzuki flying car
Maruti Suzuki flying car
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements