मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण
महाराष्ट्र : मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात समंत झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील 24 फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन गावागावात असणार आहे. प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर 29 फेब्रुवारीपासून मराठा समाजातील म्हातारे उपोषणास बसणार आहे. तसेच 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
3 मार्च लग्नाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहे. या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी. कारण या दिवशी सर्वात मोठा रास्तो रोको आंदोलन निश्चित झाला आहे. त्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारचे लग्न संध्याकाळी करावी. लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव नवरी सहभागी होतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
3 मार्चच्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु करा. या दिवशीचा रास्ता रोको आंदोलन असे करा की, संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसले. या दिवशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. दोन दिवस सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून 29 रोज रास्ता रोको होणार आहे. तसेच 29 पासून मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसवायचे आहे. आंदोलना दरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात 25 ते 30 लाख म्हतारे असतील. माझ्या आई-बाबसह सर्व म्हातारे उपोषण करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मंगळवारी (20 फेब्रुवारी) बोलावण्यात आलेल्या एक दिवसीय विशेष अधिवेशनात या आरक्षणासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र या विधेयकावर मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. आम्ही या 10 टक्के आरक्षणाचे स्वागतच करतो. मात्र आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढलेली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. अन्यथा एकदा का आंदोलनाची घोषणा झाली की मग आम्ही माघार घेणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
Maratha Reservation Manoj Jarange Advice
Maratha Reservation Manoj Jarange Advice
Maratha Reservation Manoj Jarange Advice
Maratha Reservation Manoj Jarange Advice
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements