कुठे कुठे आरक्षण मिळणार? मराठा आरक्षणाचा मसुदा
महाराष्ट्र राज्य मागासवर्गाचा अहवाल समोर आला आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याची तरतूद आहे. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग निकाली निघाला आहे.
मात्र हे 10 टक्के आरक्षण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील मागच्या बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील या विशेष अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोग जो अहवाल सादर करणार आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाचं नुकसान करणारं आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मसुद्यात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आणि राज्य सरकारच्या नियत्रणाखाली असलेल्या पदांसाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. बदलीद्वारे किंवा प्रति नियुक्ती करायची असल्यास आरक्षण लागू होणार नसल्याचं या मसुद्यात म्हणण्यात आलं आहे. इतर शैक्षणिक संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्था आणि राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना हे सरकारी आदेश लागू होतील. उन्नत आणि प्रगत गटाच तत्त्व लागू असेल अशांना आरक्षण लागू होणार नाही, असंही या मसुद्द्यात स्पष्ट केलं आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाछी आरक्षण मिळणार आहे.
Maratha Aarakshan Maratha reservation 10 percent quota
Maratha Aarakshan Maratha reservation 10 percent quota
Maratha Aarakshan Maratha reservation 10 percent quota
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements