मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे पुन्हा एकदा भारताविरुद्ध बरळले आहेत. चीनमधून परतताच Maldives President Mohamed Muizzu यांनी भारताने 15 मार्च आधी मालदीवमधून सैन्य हटवावे, असं वक्तव्य केलं आहे. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून मालदीवमध्ये भारतीय सैन्याची तुकडी तैनात आहेत. मालदीवच्या मागील सरकारने आग्रह केल्याने भारतानं आपलं सैन्य मालदीवमध्ये रवाना केलं होतं. समुद्री तटांची सुरक्षा आणि आपात्कालीन मदतीसाठी भारताचे सैन्य तैनात केले होते. तत्पूर्वी, मुइज्जू हे शनिवारी चीनच्या दौऱ्यावरून परतून मालदीवमध्ये आले. चीनमधून परतताच मुइज्जू यांनी भारताला डिवचले आहे. आमचा देश आकाराने लहान असेल, पण आमच्यावर दादागिरी करण्याचा कोणाचाही अधिकार नाही, असं मुइज्जू म्हणाले. मुइज्जू यांनी भारताचं नाव न घेता हे वक्तव्य केलं आहे. मात्र, त्यांचा रोख भारताकडे असल्याचं बोललं जात आहे.
भारत- मालदीवमध्ये तणाव का निर्माण झाला?
भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणाव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशात तणाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली होती. पीएम नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टिप्पणी केल्याने मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुर झाला होता. मालदीव आणि भारताचा तणाव वाढू लागल्याने मालदीव सरकार अडचणीत आल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरील फोटोवर मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं. मालदीव सरकारच्या टिप्पणीनंतर भारतात. बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला होता. मालदीवचा महसूल केवळ पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो. त्यात वादामुळे भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये न जाण्याचं आव्हान केलं जात आहे. भारत आणि मालदीव वादामुळे दिवसाला अंदाजे साडे आठ कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याचं बोललं जात आहे. भारत आणि मालदीव वादामुळे मालदीवनेच आपली 44 हजार कुटुंबे अडचणीत आल्याचं म्हटलं जात आहे.
Maldives President Mohamed Muizzu asks India to withdraw troops by March 15 amid deepening row
Maldives President Mohamed Muizzu Indian Army
Maldives President Mohamed Muizzu Indian Army
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements