मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत
कथित कन्नड संघटनांना पोटशूळ
बेळगाव—belgavkar Maharashtra Chief Minister Relief Fund : महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील 865 गावांतील जनतेला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत देण्याचे जाहीर केले आहे (Maharashtra Chief Minister’s Relief Fund). त्यामुळे, कथित कन्नड संघटनांना पोटशूळ उठला असून त्यांनी महाराष्ट्राच्या नावाने कोल्हेकुई सुरु केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने आणि मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनीबेळगावात येऊन सीमाभागातील 865 गावांतील लोकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
Maharashtra Chief Minister’s Relief Fund
त्यानुसार हलशीतील एका रुग्णाला आर्थिक मदतही देण्यात आली. त्यामुळे, कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. महाराष्ट्र सरकार सीमाभागात आर्थिक मदत देऊन सीमावाद उकरुन काढत आहे. कर्नाटकच्या प्रशासनात हस्तक्षेप करत आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे तक्रार करावी, अशी ओरड कन्नड संघटनांनी सुरु केली आहे. सीमाभागातील मराठी लोकांना मदत करुन येथील वातावरण बिघविडण्यात येत आहे, असा जावईशोधही त्यांनी लावला आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्राने सीमावासियांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करणार असल्याचे घोषित केले होते. त्यावेळी कर्नाटकातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आकाडतांडव केले होते. महाराष्ट्राने कर्नाटकात हस्तक्षेप करु नये, असा कांगावा त्यांनी केला होता. त्यामुळे, महाराष्ट्राने या योजनेची अद्याप अंमलबजावणी केली नाही. पण, आता मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दुर्धर रोगांवर उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येत असल्यामुळे पुन्हा पोटशूळ उठला आहे.
कर्नाटकाकडून सीमा संरक्षण आयोग नेमून महाराष्ट्र आणि इतर राज्यात राहणाऱ्या कन्नड लोकांना मदत केली जाते. मुंबई येथे जाऊन कर्नाटकाचे मंत्री मोठमोठ्या घोषणा करतात. पण, सीमाभागातील मराठी लोकांसाठी महाराष्ट्राने योजना जाहीर करताच त्यांना पोटशूळ उठत आहे. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Belgaum Maharashtra Chief Minister Relief Fund belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310