बेळगाव—belgavkar LPG Gas E-KYC : गॅसच्या ई-केवायसीची जबाबदारी संबंधित वितरकांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गॅस वितरणावेळी घरोघरी ई-केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने गॅस ई-केवायसीचा आदेश बजावला आहे. त्यामुळे गॅस एजन्सींसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र ई-केवायसीची जबाबदारी वितरकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची ई-केवायसीची धडपड थांबणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्व ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शनचे बायोमेट्रीक म्हणजेच ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने ई-केवायसीसाठी एजन्सी कार्यालयांसमोर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. यासाठी आता ई-केवायसीचे काम घरोघरी फिरून गॅस वितरण करणाऱ्या वितरकांकडे सोपविण्यात आले आहे. गॅसच्या वितरणावेळीच संबंधित ग्राहकांची ई-केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी एजन्सी कार्यालयांकडे गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महिनाभरापासून ग्राहकांची ई-केवायसीसाठी धडपड सुरू आहे. गॅस वितरण करणाऱ्या कार्यालयांसमोर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास होऊ लागला आहे. मात्र आता ग्राहकांची ई-केवायसी करण्याची जबाबदारी वितरकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गॅस वितरणाबरोबरच ई-केवायसीचे काम पूर्ण होणार आहे.
Belgaum LPG Gas E-KYC Online belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements