ब्रिटीश साम्राज्याला अस्मान दाखवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लंडनमध्ये उभारली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज लॅार्ड मेयर ॲाफ लंडन मायकल मिलेनी (Lord Mayor of London Michael Mainelli) यांच्या सोबत महाराष्ट्र आणि लंडन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा झाली. पर्यावरण, स्वच्छ हवा, AI तंत्रज्ञान या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने AI सेंटर सुरू करण्याचा मानस मेयर ॲाफ लंडन यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र आणि लंडन मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मिलेनी यांनी लंडन मधील आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा मानस व्यक्त केला. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतानाच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेन्री ली, अभिजीत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टीफिशिअल इंटिलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मिलेनी काय म्हणाले? : महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध दृढ असून ते अधिक वृद्धींगत होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणुकीला मोठा वाव असून भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असल्याने उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दर्शविल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी अटल सेतूवरून प्रवास केल्याचा अनुभव कथन करतानाच तो भव्य आणि दर्जेदार असल्याचे मिलेनी यांनी सांगितले.
lord mayor of london cm shinde shivaji maharaj
lord mayor of london cm shinde shivaji maharaj
lord mayor of london cm shinde shivaji maharaj
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements