भाजपकडून ‘या’ बड्या नेत्याला ऑफर;
काय म्हणाले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर?
बेळगाव—belgavkar : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) स्वगृही परतणार असल्याची चर्चा रंगली आहे. शेट्टर यांना बेळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये परतण्यासाठी माझ्यावर दबाव आहे; पण अपमानित होऊन मी तिथून बाहेर पडलो आहे. आता माघारी परतण्याची परिस्थिती नसल्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. जगदीश शेट्टर यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर अडचणी निर्माण झाल्याची भावना पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि माजी आमदारांमध्ये आहे. त्यासाठी मी स्वगृही परतावे, असे त्यांनी अनेक प्रसंगी सांगितले आहे.
मात्र, प्रभावशाली नेत्यांनी अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही. त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. मी भाजपचे माजी आमदार शंकर पाटील यांच्यासह कोणत्याही नेत्यावर जबरदस्तीने काँग्रेसमध्ये जाण्यासाठी दबाव आणत नाही. रामण्णा लमाणी आदींनी तुम्ही जिथे असाल, तिथे आम्ही असू, असे सांगितले आहे. त्यांना आपण काँग्रेस नेत्यांकडे नेऊन त्यांची भेट घेतल्याचेही ते म्हणाले.
राम मंदिराचा मुद्दा राजकीय बनू नये. राजकारणात धर्म असला पाहिजे, धर्मात राजकारण नाही. अयोध्येत राममंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिर होत आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. राममंदिर गर्भगृहाच्या स्थापनेसाठी त्यांनी काही निवडक लोकांना आमंत्रित केले आहे. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना येथे निमंत्रित करण्यात आलेले नाही, असा भेदभाव का…?
राममंदिरात कुणीही जाऊ शकतो. त्यात राजकारण का, असा सवाल त्यांनी केला. 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नसून श्री राम मंदिर ट्रस्टने दिले होते. कोणाला आमंत्रण द्यायचे आणि कोणाला न द्यायचे हे ट्रस्टने ठरवायचे आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, बहिष्कार घालणार असल्याचे त्यांनी सांगितले नाही. याशिवाय काँग्रेसमधील कोणीही जाऊ नका, असे सांगितले नाही. मला निमंत्रण पत्रही मिळाले आहे, पण मी जाणार नाही, असे ते म्हणाले.
Loksabha Election Former CM Jagadish Shettar BJP Belgaum belgav belagavi belgavkar
Loksabha Election Former CM Jagadish Shettar BJP
Loksabha Election Former CM Jagadish Shettar BJP
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements