बेळगाव—belgavkar : वायव्य परिवहन महामंडळाने बस प्रवास तिकीट दरामध्ये रुपयाची वाढ केली आहे. 1 जानेवारीपासून दरवाढ झाली आहे. शिवाय या विभागात प्रायोगिक तत्त्वावर जारी केलेल्या कॅशलेस व्यवस्थेत दीड कोटींचा व्यवहार झाला आहे. पुढील महिन्यापासून महामंडळाच्या सर्व बसेससाठी कॅशलेस तिकीट व्यवस्था लागू होणार असून जुनी व्यवस्थाही सुरु राहणार आहे (KSRTC Bus Fare)
परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अपघात विम्यासाठी तिकीट दरात रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सर्वांसाठी नाही. 50 रुपयांवरील प्रवाशांना ₹ 1 रुपया जादा द्यावा लागणार आहे. 50 रुपयांच्या आतील तिकिटासाठी कोणतीही वाढ केली नाही. अपघात विम्याची रक्कम ₹ 1 लाख रुपये होती. ती आता ₹ 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दरवाढ केल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत एम. यांनी कळवले आहे. बस प्रवासावेळी सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली आहे. ती अजूनही कायम आहे. त्यावर ऑनलाईन किंवा कॅशलेस व्यवहाराचा पर्याय शोधण्यात आला आहे. क्यू आर कोडद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सुट्या पैशांच्या समस्येवर मात करण्यासाठी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वप्रथम वायव्य महामंडळाच्या बसेसमध्ये प्रयोग केला. वाहकांना गेल्या 1 सप्टेंबरपासून क्यू आर कोड उपलब्ध करुन दिला. हुबळीतील तिसऱ्या आगाराच्या बसेससाठी ही व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांनी फोन पे, गुगल पे आदींवरुन कॅशलेस सेवेचा लाभ घेतला. आतापर्यंत याद्वारे दीड कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाला आहे. प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आता महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये कॅशलेस व्यवस्था लागू केली जाणार आहे.
Belgaum KSRTC Bus Ticket Price Fare Hike belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
KSRTC Bus Ticket Price Fare Hike
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements