कर्नाटक-बेंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे. ही घटना त्याच घटनांपैकी एक आहे. आईने नाश्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाने आईची हत्या केली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना केलेल्या कृत्याची कबुली दिली. ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणात आता पुढील तपास सुरु आहे (Karnataka teen kills mother for not serving breakfast).
नेमकं काय घडली घटना? : मुलाने सकाळी आईला नाश्ता देण्यास सांगितलं. आईने नाश्ता दिला नाही त्याचा राग या मुलाला अनावर झाला. त्याच रागातून त्याने त्याच्या आईची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना जाऊन सगळा प्रकार सांगितला. आईचा राग आल्याने या मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. या घटनेत आईचा मृत्यू झाला आहे. या मुलाने पोलिसांसमोर जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. हत्येनंतर आरोपींनी केआर पुरा पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. केआर पुरा येथील न्यायमूर्ती भीमैया लेआउट येथे राहणाऱ्या नेत्रावती (वय, 40) यांची हत्या करण्यात आली. आरोपी 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलाने त्याचा जबाब नोंदवला. आईने नाश्ता देण्यास नकार दिल्याने हा मुलगा खूपच चिडला होता. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने त्याच्या आईच्या डोक्यात वार केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलीस ठाण्यात आत्मसर्मपण केलं. या मुलाची चौकशी करण्यात येते आहे. तसंच या हत्येमागे फक्त राग होता की आणखीही काही कारण होतं हे तपासलं जातं आहे.
कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेला आरोपी गुरुवारी घरी आला होता. रात्री आई आणि मुलामध्ये भांडण झाले. तो रागावला आणि न जेवता झोपला. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी तयार झाला. सकाळी 7.30 वाजता आई नाश्ता न करता झोपत असल्याचे पाहून त्याला राग आला. त्याने नाश्ता का बनवला नाही असा प्रश्न आईला विचारला. त्यानंतर रागाच्या भरात नेत्रावतीनेही त्याला शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. दरम्यान, संतापलेल्या मुलाने घरात उपस्थित असलेल्या लोखंडी रॉडने नेत्रावती यांच्या डोक्यात वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले. नेत्रावती यांचे कुटुंब गेल्या 30 वर्षांपासून केआर पुरा येथे राहत होते.
Karnataka teen kills mother for not serving breakfast. Karnataka teen kills mother for not serving breakfast.
Karnataka teen kills mother for not serving breakfast
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements