आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा
बेळगाव—belgavkar Karnataka Teachers Recruitment : शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक भरतीवर संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, मात्र सातत्याने शिक्षक भरती परीक्षा पास झालेले परीक्षार्थी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावत आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होण्यास मोठा विलंब झाला आहे (Supreme Court has stayed the Karnataka High Court’s division bench order allowing the state government to go ahead with recruitment of 13,352 selected candidates to the post of Graduate Primary School Teachers).
नोव्हेंबर २०२२ मध्ये शिक्षण खात्याने शिक्षक भरतीसाठी तत्कालीक यादी जाहीर केली होती. मात्र या यादीवर आक्षेप घेत अनेकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने शिक्षण खात्याला नवीन यादी जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली होती, त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ८० टक्के पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. तर काही पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र मिळाले नाही अशा शिक्षकांना भरतीचे पत्र अद्याप देण्यात आलेले नाही अशा शिक्षकांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गोची होणार आहे.
उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी परवानगी दिल्यानंतर काही उमेदवारांनी आरक्षण योग्य प्रकारे लागू करण्यात आलेले नाही, तसेच गुणवत्ता असूनही लावण्यात आल्याची तक्रार करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या, तरीही न्यायालयाने शिक्षक भरती पूर्ण करण्याची सूचना केल्यामुळे काहीजणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक भरती पूर्ण होण्यास विलंब होणार आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत 80 टक्के शिक्षकांच्या जागा भरती करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरतीला स्थगिती दिली असली, तरी जे शिक्षक रुजू झाले आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. मात्र ज्या उमेदवारांना अद्याप नियुक्त पत्र देण्यात आलेले नाही, त्या उमेदवारांची अडचण होणार आहे. शिक्षण खाते व सरकार जो निर्णय दिला त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया राबविली जाईल : मोहनकुमार हंचाटे, जिल्हा शिक्षणाधिकारी
Belgaum Karnataka Teachers Recruitment belgavkar
Karnataka Teachers Recruitment Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements