Karnataka HD Deve Gowda यांचा गंभीर आरोप, सिद्धरामय्या-डीकेंवर साधला निशाणा
शिवकुमार यांनी पैसे किती आणि कुठे नेले हे आता उघड
कर्नाटक Karnataka HD Deve Gowda : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने (Congress Government Karnataka) 5 राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा पैसा वापरल्याचा आरोप धजदचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी शुक्रवारी केला. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरही पत्रकार परिषदेत निशाणा साधला (Deve Gowda accuses Karnataka Congress of spending tax payers’ money to fund assembly polls in 5 states).
ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाच राज्यांतील निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाला दिला. तो जनतेचा पैसा सिद्धरामय्या रोखू शकले नाहीत. सिद्धरामय्या आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी पैसे किती आणि कुठे नेले हे आता उघड झाले आहे.
स्वच्छ सरकार देण्याच्या सिद्धरामय्या बंगळुरमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर गोष्टी का रोखल्या नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान बंगळरुरातून किती पैसे गेले? ही संपत्ती कोणाची आहे? हा कर्नाटकातील जनतेचा पैसा आहे. आमचे उपमुख्यमंत्री शिवकुमार आणि त्यांचा उद्धटपणा वाढत आहे. निवडणुकीदरम्यान ते कुठे गेले? ते किती पैसे घेऊन गेले? केंद्रीय निवडणूक आयोगने किती पैसे जप्त केले, हे सर्व आता उघड झाले आहे.
सर्व बंगळुरातील एजन्सी जसे की, ब्रृहन बंगळूर महानगरपालिका आणि बंगळूर विकास प्राधिकरण आणि सिंचन खाते त्यांच्या (शिवकुमार) हातात आहेत. येथे काय चालले आहे, हे पाहून मला लाज वाटते. भ्रष्टाचार सिद्धरामय्या का रोखू शकले नाहीत.’’ मला माहित नाही की, सिद्धरामय्यामध्ये भ्रष्टाचार रोखण्याची ताकद आहे की नाही. ते देशाला व्याख्यान देतात की, कोणीही त्यांच्या प्रशासनाकडे बोट दाखवू शकत नाही. गरीब, अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि ‘अहिंद’ दलित खंबीरपणे यांच्या पाठीशी उभे आहेत. तरीही पैसा वाहत आहे! ते भ्रष्टाचार का थांबवू शकत नाहीत, असा सवाल देवेगौडा यांनी केला.
गेल्या वर्षी मेमध्ये २२४ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत धजदने खराब प्रदर्शन केले आणि फक्त १९ जागा जिंकल्या. काँग्रेसला १३५ आणि भाजपला ६६ जागा मिळाल्या. आता लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मागे खेचण्याचा भाजप-धजद युतीचा प्रयत्न असल्याचे देवेगौडा यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये धजद भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाला. दोन्ही पक्षांनी कर्नाटकात आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements