Karnataka classifies snakebite as a notifiable disease
बेळगाव—belgavkar @कर्नाटक : कर्नाटक राज्य शासनाने सर्पदंशाला अधिसूचित आजारांच्या यादीत समाविष्ट केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही ठिकाणी झालेल्या सर्पदंशाच्या घटनांची नोंद राज्य पातळीवर केली जाणार आहे. असा निर्णय घेणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वांगीण आरोग्य माहिती मंचमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये सर्पदंशाचा समावेश झाला आहे (Karnataka classifies snakebite as a notifiable disease).
सरकारी, खासगी रुग्णालये, वैद्यकीय संस्थांमध्ये दाखल झालेले सर्पदंशाचे रुग्ण, सर्पदंशावर रुग्णालयात उपचार घेणारे, बाह्यरुग्णांची माहिती, सर्पदंशाने मृत्यूची नोंद आरोग्य मंचमध्ये केली जाणार आहे. याचा अर्थ राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात सर्पदंश प्रकरण आल्यास त्याची नोंद सर्वांगीण रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या फाईलमध्ये होणार आहे. राज्यामध्ये वाढलेल्या सर्पदंशाच्या घटनांमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात कर्नाटकात सर्पदंशाच्या 5,316 घटना घडल्या होत्या.
राज्यातील प्रत्येक सर्पदंश घटनेची सविस्तर माहिती राज्य सरकार नोंदवून घेणार आहे. नियंत्रणासाठी आधी माहिती संग्रहित केली जाणार आहे. त्यानंतर सर्पदंशाच्या घटनांबाबत जागृती करुन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. मानव आणि साप यांच्यातील शत्रुत्व कमी करण्यासाठी सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. बेळगावसह परिसरात रोज सर्पदंशाच्या घटना घडतात. साप चावला की व्यक्ती घाबरते. आपल्या जीवाचे बरेवाईट होण्याची शंका तिला असते. सर्पदंशावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. स्थानिक डॉक्टरांनाही सर्पदंशाबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. सर्पदंशानंतर नजीकच्या रुग्णालयात त्यावरील लस उपलब्ध असणे गरजेचे आहे.
Belgaum Karnataka classifies snakebite as a notifiable disease belgav belagavi belgavkar explore digital india
Karnataka classifies snakebite as a notifiable disease
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements