व्याजासह ₹ 439 कोटी रुपये….
बेळगाव—belgavkar : साखर कारखान्याच्या विकासासाठी घेतलेले कर्ज व्याजासह 439 कोटी रुपये न भरून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल केलेली तक्रार आणि गुन्हा रद्द करण्याची मागणी करत भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सौभाग्य लक्ष्मी शुगर्स लिमिटेडचे (Soubhagya Lakshmi Sugars, Gokak) व्यवस्थापकीय संचालक रमेश जारकीहोळी आणि अन्य दोन संचालक वसंत पाटील आणि शंकर पावडे यांच्या वकिलांनी न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय खंडपीठासमोर हे प्रकरण मांडले. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होईल, असे न्यायमूर्तीनी सांगितले. कराराचे उल्लंघन केल्यावरून फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे.
कायद्यानुसार केवळ कराराचा भंग केल्याबद्दल फौजदारी कार्यवाही सुरू केली जाऊ शकत नाही आणि कर्जदाराला पक्षकार न बनवता फौजदारी कार्यवाही करणे हा कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. त्यामुळे संपूर्ण फौजदारी कारवाईच रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
Belgaum Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi booked for defaulting on Rs 439 crore loan belgav belagavi belgavkar
Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi Rs 439 crore loan
Karnataka BJP MLA Ramesh Jarkiholi Rs 439 crore loan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements