कर्नाटक hubli accident NH4 : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (NH4) धारवाडच्या कुंदगोळ येथील बेळ्ळीगट्टी क्राॅसजवळ दोन कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एक कार हासनहून गोव्याला जात होती. तर दुसरी कार बेंगळुरूहून शिर्डीला जात होती. या दोन्ही कारमध्ये अपघात झाला आणि त्यानंतर त्यातील एक कार एका लॉरीला धडकली.
हासन येथील मणिकंठ (26), पवन (23), चंदन (31) तसेच बेंगळुरू येथील प्रभू (34) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत आणखी 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.