hike in sugarcane FRP by Rs 25 to Rs 340 per quintal
पुढील वर्षीच्या साखर हंगामात उसाच्या एफआरपीत (योग्य आणि लाभदायी मूल्य) प्रतिटन 250 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केला. या निर्णयामुळे पुढील वर्षीच्या हंगामात उसाला प्रतिटन 3400 रुपये दर मिळणार आहे (Union Cabinet approves hike in sugarcane FRP by ₹25 to ₹340 per quintal amid farmers’ protest).
The government has decided to increase the Fair and Remunerative Price (FRP) for sugarcane growers by Rs 25 to Rs 340 per quintal for the 2024-25 season, marking the highest increase since 2014.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन वर्षांत एफआरपीच्या तुलनेत साखरेच्या हमीभाव दरात वाढ नाही. त्यामुळे एफआरपीत वाढलेली रक्कम राहू देच, या वर्षाची एफआरपीसुद्धा देता येणार नाही, अशी स्थिती आहे.
उताऱ्याचा बेस 10.25 टक्के कायम ठेवल्याने वाढीव दर कारखान्यांना परवडणार नाही. यावर साखरेचे दुहेरी दर या धोरणाशिवाय पर्याय नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केंद्राने साखर उद्योगास पूरक निर्णय घेतला; परंतु नैसर्गिक कारणामुळे यंदा साखर उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता. त्यातून साखर निर्यात, इथेनॉल निर्मितीमधील पन्नास टक्के कपात असे निर्णय घेतले. फेब्रुवारी 2024 मधील अंदाजापेक्षा साखर उत्पादन वाढेल. यामुळे देशातील साखर दर प्रतिक्विंटल 3700 ते 3800 वरून 3350 ते 3400 पर्यंत खाली आले.
हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे वाढलेले दर, इथेनॉलचे उत्पन्न याचा विचार करून बहुतांशी कारखान्यांनी यावर्षीच्या एफआरपीपेक्षा जादा दर जाहीर केले. तथापि गृहीत दर आणि आजची स्थिती यात मोठी तफावत आहे. परिणामी कारखान्यांसमोर यंदाच्या हंगामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा विचार न करता पुढील हंगामासाठी थेट प्रतिटन 250 एफआरपीतील वाढ केली आहे. साखर उत्पादन खर्च आणि मिळणारे एकूण उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. अशा स्थितीत एफआरपीत झालेली वाढ काखान्यांना देणे अडचणीचे ठरणार आहे.
साखरेचा दर 3100 रुपये होता, त्यावेळी 2750 रुपये एफआरपी होती. त्यानंतर चार वेळा एफआरपीमध्ये वाढ झाली; पण साखरेचे दर तेच राहिले आहेत. त्यात वाढ केली पाहिजे; अन्यथा त्याचा कारखान्यांना फटका बसणार आहे, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना दर कसा मिळणार, याविषयी संभ्रम आहे.
hike in sugarcane FRP by Rs 25 to Rs 340 per quintal
hike in sugarcane FRP by Rs 25 to Rs 340 per quintal
hike in sugarcane FRP by Rs 25 to Rs 340 per quintal
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements