त्यांना अतिरीक्त 10 टक्के ऐवजी 10 युनिट अधिक वीज
बेळगाव—belgavkar : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मोफत वीजपुरवठा करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या ‘गृहज्योती’ योजनेच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे (Gruha Jyothi : Karnataka government changes rule for free electricity scheme). गृहज्योती योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारने ग्राहकाला त्याने वापरलेल्या विजेची वार्षिक सरासरी अधिक 10 टक्के असे मिळून मोफत वीज देण्याचे निकष ठरविले होते. आता 10 टक्के हा निकष काढून टाकण्यात आला असून त्याऐवजी 10 युनिट असा बदल करण्यात आला आहे.
ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी याविषयी माहिती दिली. गृहज्योती योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार वार्षिक सरासरीवर 10 टक्के अधिक वीज वापरण्यास ग्राहकाला मुभा देण्यात आली होती. ग्राहकांना 10 टक्के ऐवजी 10 युनिट अधिक वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (10 extra units instead of 10% norm | Karnataka Gruha Jyothi).
पुढील महिन्यातील बिलातच 10 युनिट अधिक मोफत वीज देण्याची तरतूद केली जाईल. यामुळे राज्य सरकारवर वर्षाला 500 कोटी रुपयांचा अधिक भार पडणार आहे. तसेच कर्नाटक वीज निगमने घेतलेल्या 4450 कोटी रुपये शुल्काला सरकारी हमी देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या कर्जाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे वीज पुरवठा महामंडळाने हमी देण्याची विनंती केली होती. त्यामुळे सरकारने आता 4450 कोटी रु. कर्जावर हमी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री के. जे. जॉर्ज यांनी दिली.
Belgaum Gruha Jyothi Karnataka rule free electricity belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Gruha Jyothi Karnataka rule free electricity
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements