मानवी मेंदूत बसवली चिप, काय करेल काम
First Neuralink brain implant in a human
कृत्रिम बुद्धमता, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(AI) नंतर आता विज्ञानाने पुढील झेप घेतली आहे. जगातील अब्जाधीश Elon Musk यांच्या कंपनीने हॉलिवूड चित्रपटात पाहतो, तसे फिक्शन केले आहे. त्याने मानवी मेंदूत चिप बसवली आहे. या अनोख्या प्रयोगाची सध्या जगभर चर्चा रंगली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. विज्ञानाला आव्हान देणाऱ्या या प्रयोगाकडे जगाचे लक्ष लागले आहे. थेट निसर्गाला आव्हान देणारा हा प्रकल्प आहे तरी काय (Neuralink implants brain chip in first human patient)
कंपनीच्या दाव्यानुसार, ही चिप तुमच्या मेंदूतील विचार वाचू शकते. ज्या व्यक्तीच्या मेंदूत ही चिप बसविण्यात आली (First Neuralink brain implant in a human). त्याने एक अक्षर जरी उच्चारले नाही तरी, तो मशिनींसोबत संवाद साधू शकतो. सध्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्ते स्मार्टफोन आणि संगणक नियंत्रीत करत आहेत. ही चिप मेंदूत बसविण्यापूर्वी तिची चाचणी करण्यात येते. त्यानंतरच ती बसविण्यात येते, असे मस्कने स्पष्ट केले आहे (Elon Musk’s neurotechnology company Neuralink has successfully implanted one of its wireless brain chips, named Telepathy, in a human for the first time).
एलॉन मस्क यांनी एक्सवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, न्यूरोटेक्नोलॉजी कंपनी Neuralink ने पहिल्यांदा मानवी मेंदूत ‘ब्रेन चिप’ बसवली आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यात ही चिप बसवली आहे तो व्यक्ती ठीक होत आहे. या प्रयोगाचे सुरुवातीचे निकाल, परिणाम आशादायक आहेत. याप्रयोगानुसार, मानवी मेंदूत जी चिप बसविण्यात आली आहे. ती 5 रुपयांच्या शिक्क्याइतकी आहे. मस्क यांनी न्यूरालिंक प्रकल्पाच्या या भन्नाट प्रयोगाला Telepathy हे नाव दिले आहे. 2016 मध्ये मस्क याने हे स्टार्टअप सुरु केले होते. गेल्या वर्षी युएस फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने त्याला मंजूरी दिली होती. त्यानंतर लागलीच या प्रयोगाची चाचणी करण्यासाठी या स्टार्टअप्सने भरती प्रक्रिया सुरु केली. त्यात काही जणांची प्रयोगासाठी निवड करण्यात आली.
हे तंत्रज्ञान दृषिहीन-अंध व्यक्तींसाठी वरदान ठरेल. अंपगत्व आलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. स्मृतीभंश झालेल्या रुग्णांसाठी ही जादूची शक्ती असेल. तसेच मेंदूविकाराशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या जीवनात यामुळे आशेचा एक किरण उगवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
First Neuralink brain implant in a human. First Neuralink brain implant in a human
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements