राजकारण पेटलं, पुढे काय घडलं?
ED summons to farmers with Rs 450 in their account : ईडीच्या कारवायांवरून विरोधक सातत्याने सत्ताधारी भाजपावर निशाणा साधतात. सत्तेचा दुरुपयोग करून भाजपा विरोधकांच्या मागे ईडी लावते असा आरोप केला जातो. त्यातच आता तामिळनाडूत असे प्रकरण समोर आलंय ज्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील अट्टूर येथील 2 शेतकऱ्यांना ईडीने समन्स पाठवले आहे. ज्यात तपास यंत्रणेने त्यांच्या जीताचा उल्लेख केल्याचाही आरोप आहे. हे प्रकरण सेलम जिल्ह्यातील अट्टूरमध्ये राहणारे दोन भाऊ कन्नैयन आणि कृष्णन यांच्याशी निगडीत आहे.
एस कन्नैयन आणि त्यांचा भाऊ कृष्णन यांनी त्यांच्या शेताच्या चारीबाजूला बेकायदेशीर वीजेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे 2 भारतीय जंगली गव्यांचा मृत्यू झाला होता. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्या दोघांविरोधात 2017 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता.त्यानंतर कोर्टात या प्रकरणी 28 डिसेंबर 2021 ला शेतकरी कृष्णन आणि कन्नैयन या दोघांना निर्दोष सोडले. परंतु या घटनेनंतर FIR चा आढावा घेत ईडीने तामिळनाडू वनविभागाच्या एका पत्राच्या आधारे मार्च 2022 मध्ये या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली.
परंतु हा वाद 5 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांना जारी केलेल्या ईडी समन्समुळे उभा राहिला. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले आहे. ईडीने या दोन शेतकऱ्यांना समन्स पाठवले आहे. त्यात दोघांच्या जातीचा उल्लेख केला आहे. त्यावर तामिळनाडूतील राजकीय पक्ष आणि समाजसेवकांनी आक्षेप घेत विरोध केला आहे. या शेतकऱ्यांच्या वकिलाने दावा केलाय की, ईडीची ही कारवाई शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. कारण हे दोन शेतकरी स्थानिक भाजपा नेते गुनासेकरन यांच्याशी कायदेशीर लढा देत आहेत. वकिलांनी केवळ ईडीच्या हेतूवर संशय घेतला नाही तर त्यांनी पाठवलेल्या समन्सवर नाराजी व्यक्त करत ईडी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.
कृष्णन यांनी सांगितले की, हे प्रकरण जमिनीचे खरे मालक आणि बनावट दस्तावेज यात आहे. गुनासेकरन यांच्याविरोधात कोर्टात अर्ज दाखल केला होता. आम्ही 2020 पासून यात कायदेशीर लढा देत आहोत. ईडीने आमच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली. गेल्या 4 वर्षापासून आम्ही शेती केली नाही. आमच्या बँक खात्यात केवळ 450 रुपये आहेत. सरकारकडून वृद्ध व्यक्तींना देण्यात येणारे प्रतिमाह 1000 रुपये आणि मोफत रेशन यावर आमचा उदर निर्वाह सुरू आहे. आमच्या जमिनीवर गुनासेकरन यांनी अवैध कब्जा केला आहे.
दरम्यान या प्रकरणी एका आयआरएस अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपर्दी मुर्मू यांना पत्र पाठवून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांना बरखास्त करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्याशी कायदेशीर वादानंतर ईडीने सेलम जिल्ह्यातील 2 गरीब शेतकऱ्यांना समन्स पाठवले. 72 वर्षीय कन्नैयन आणि 67 वर्षीय कृष्णन यांच्याकडे तामिळनाडूच्या अट्टर इथं साडे सहा एकर जमीन आहे. या जमिनीवरून भाजपाचे माजी जिल्हा सचिव गुनासेकरन यांच्याशी वाद सुरू आहे. या वादामुळे गेल्या 4 वर्षापासून या शेतकऱ्यांना शेती करता आली नाही. गुनासेकरन यांच्याविरोधात कृष्णन यांनी 2020 मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यात त्यांना अटक होऊन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements