रेड टाकायला गेलेल्या ‘ईडी’च्या टीमवर हल्ला, गाडी फोडली
ED team attacked in West Bengal’s North 24 Parganas: Officials : सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी…. ED चे नाव घेताचं सध्या देशभरातील राजकीय नेत्यांना धडकी भरते. मंत्री असो की आमदार, चौकशीसाठी बोलावून थेट अटक केली जाते. घरांवर रेड टाकली जाते. त्यामुळे प्रामुख्याने विरोधी पक्षाकडून ईडीच्या कारवायांवर सातत्याने टीका होते. अशीच एक रेड टाकत असताना ईडी अधिकाऱ्यांना एका नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे ही घटना घडली आहे (Trinamool Congress leader’s residence at Sandeshkhali in West Bengal North 24 Parganas district.). ईडीचे अधिकारी शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे (TMC) पदाधिकारी शाहजहान शेख आणि शंकर आध्य व नातेवाईकांच्या घरी रेड टाकण्यासाठी गेले होते. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. रेशनिंग वितरण घोटाळ्याप्रकरणी ही रेड टाकण्यात आली (Enforcement Directorate (ED) was attacked during a raid of a TMC leader’s house in connection with an alleged ration scam).
ईडीचे (ED) अधिकारी शेख यांच्या घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी आत प्रवेश करण्यासाठी अनेकदा दरवाजा वाजविला. त्यांना आवाज दिला. पण दरवाजा उघडला नाही. याचवेळी जवळपास शंभर जणांचा जमाव घराबाहेर आला. यामध्ये महिलांचाही समावेश होता. त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यातील काहींनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून एका गाडीचे नुकसान केले. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. कुणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेशनिंग घोटाळाप्रकरणी यापूर्वीच तृणमूलच्या एका माजी मंत्र्यांना अटक करण्यात आले आहे. ईडीकडून महिनाभरापासून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आता हल्ल्याच्या घटनेनंतर हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements