यावेळी केंद्रबिंदू नेमका कुठे?
भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये
देशाची राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरली आहे. दिल्ली-एनसीआर, पंजाब सह चंदीगढ, जम्मू कश्मीर आणि लडाखमध्ये भूकंपाचे धक्का जाणवले. भूकंपाचे धक्के या ठिकाणी बराच वेळ जाणवले. भूकंप आल्याचं लक्षात येताच लोक आपल्या घरातून आणि कार्यालयातून बाहेर निघाले. आतापर्यंत भूकंपाच्या धक्क्यांमुळं जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे (Earthquake : Tremors felt in Delhi-NCR after magnitude 6 quake hits Afghanistan)
राजधानी दिल्लीत जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्याचं केंद्र अफगानिस्तानच्या फैजाबादमध्ये होतं. हिंदुकुश क्षेत्रात याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ इतकी होती. या भूकंपाचे धक्के पाकिस्तानात देखील जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जम्मू कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील पीर पंचाल क्षेत्रातील दक्षिण भागात भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचे धक्के या प्रकारे भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तामध्ये जाणवले. पाकिस्तानात देखील लोक घरांच्या आणि कार्यालयांच्या बाहेर निघून आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दरम्यान, तज्ज्ञांनी दिल्ली आणि एनसीआर भागात भूकंपाचा इशारा दिलेला आहे. तज्ज्ञांच्या मते दिल्ली आणि एनसीआरमध्ये केव्हाही मोठा भूकंप होऊ शकतो. मात्र, भूकंप केव्हाही येऊ शकतो यासंदर्भात त्यांनी माहिती दिली नाही. राजधानी दिल्ली गेल्या काही महिन्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी त्या भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये होतं. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के वाढले आहेत. दरम्यान, त्या भूकंपांची तीव्रता कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा आर्थिक हानी झालेली नाही. उत्तर भारतातील भूकंपाच्या वाढत्या घटना अभ्यासकांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे.
Earthquake of magnitude 6.1 struck Afghanistan on January 11 with tremors rippling through parts of north India
Earthquake Delhi-NCR and Afghanistan
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310