INS Visakhapatnam | समुद्री डाकूंचा धोका वाढला
अदनच्या खाडीत (एडनचे आखात – Gulf of Aden) एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला आहे. त्यानंतर भारतीय नौदलाने तात्काळ Action घेतली. भारतीय नौदलाने मिसाइल डिस्ट्रॉयर INS विशाखापट्टणमला अदनच्या खाडीत तैनात केलय (rescue of a cargo vessel under attack by drones in the Gulf Aden). व्यापारी जहाजांच्या संरक्षणासाठी भारतीय नौदलाने warship INS Visakhapatnam ही तैनात केली आहे.
बुधवारी रात्री 11.11 मिनिटांनी समुद्री दहशतवाद्यांनी एमवी जेनको पिकार्डी या जहाजावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती मिळाली. भारतीय नौदलाकडे मदतीची मागणी करताच तात्काळ पावल उचलण्यात आली. INS विशाखापट्टणममध्ये मिसाइल नष्ट करण्याची क्षमता आहे. अदनच्या खाडीत समुद्री डाकूंपासून व्यापारी जहाजांच संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. INS विशाखापट्टणमच मिशन मोडवर काम सुरु आहे. हल्ला झाल्याच कॉल येताच भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने तासाभरात संकटात असलेल्या एमवी जेनको पिकार्डी जहाजाला शोधून काढलं व मदत पोहोचवली (Marshall Island flagged MV Genco Picardy – Marshall Island-flagged ship in the Gulf of Aden). नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर 9 भारतीयांसह एकूण 22 सदस्य होते. हल्ल्याला लगेच सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं. जहाजाला समुद्री डाकूंपासून वाचवण्यात आलं.
एमवी जेनको पिकार्डीच्या मदतीसाठी पोहोचलेल्या INS विशाखापट्टणमच्या अधिकाऱ्यांनी शोध घेऊन जहाज सुरक्षित असल्याच सांगितलं. नौदलाने सांगितलं की, अशा ऑपरेशन्ससाठी ईओडी (Explosive Ordnance Disposal किंवा EOD) नावाच्या पथकाची स्थापना करण्यात आलीय. ईओडी टीमला स्फोटके निकामी करण्याची ट्रेनिंग देण्यात आली. 18 जानेवारीला सकाळी ईओडीच्या एक्सपर्ट्सनी व्यापारी जहाज एमवी जेनको पिकार्डीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तपासणीनंतर EOD ने जहाजाला पुढच्या प्रवासासाठी हिरवा कंदील दाखवला.
Navy’s INS Visakhapatnam rescues merchant ship attacked by drone in Gulf of Aden
Indian Navy responds to drone attack on merchant vessel in Gulf of Aden
drone attack merchant vessel Gulf of Aden
drone attack merchant vessel Gulf of Aden
drone attack merchant vessel Gulf of Aden
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310