चंपत राय यांनी सांगितली तारीख Video
अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. पण, राम मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी दर्शनासाठी केव्हापासून सुरु होईल? असा प्रश्न अद्याप कायम होता. याचं उत्तर मिळालं आहे. राम मंदिर २३ तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली आहे. ते सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
चंपत राय यांनी सांगितलं की, राम मंदिर २३ जानेवारीपासून कायमस्वरुपी लोकांसाठी खुले असेल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्रतिष्ठापणा मंदिरात होईल. यावेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नृत्य गोपालजी महाराज, यूपीचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सर्व ट्रस्टी उपस्थित राहतील (Devotees allowed to visit Ram Mandir from Jan 23 – Champat Rai).
प्राणप्रतिष्ठा दुपारी १ वाजेपर्यंत पार पडेल. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी आणि इतर काही मान्यवर आपले विचार प्रकट करतील. नेपाळच्या जनकपूर आणि मिथिलाच्या भागातून १ हजार बास्केटमध्ये उपहार आले आहेत. २० आणि २१ तारखेला मंदिर दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद असेल, अशी माहिती चंपय राय यांनी दिली. १६ जानेवारीपासून अयोध्येत विविध विधींना सुरुवात झाली आहे.
#WATCH | "Ram temple will be open for darshan for the general public from 23rd January," says Champat Rai, General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra trust. pic.twitter.com/GGwArdlbU4
— ANI (@ANI) January 15, 2024
२२ जानेवारीचा राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा भव्य असणार आहे. देश-विदेशातील जवळपास आठ हजार मान्यवर लोकांना उद्घाटनाचे निमंत्रण मिळाले आहे. चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राणप्रतिष्ठेसाठी १५० पेक्षा अधिक संत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पद्म पुरस्कार व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या दिवसाला ऐतिहासिक करण्यासाठी ट्रस्ट करुन प्रयत्न केले जात आहेत.
Devotees allowed to visit Ram Mandir from Jan 23 – Champat Rai
Devotees allowed to visit Ram Mandir Ayodhya
Devotees allowed to visit Ram Mandir Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements