CFO पासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच Deepfake
Deepfake CFO tricks Hong Kong biz out of $25 million
आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी काही चांगल्या तर, काही अत्यंत वाईट असतात. सध्या अशाच वाईट गोष्टींपैकी एक असलेला Deepfake (Deepfake Video) चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटींचे Deepfake फोटो, व्हिडीओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून डीपफेकचा वापर लोकांना बदनाम करण्यासाठी केला जात आहे. एवढंच नाहीतर केवळ सेलिब्रिटीच नाहीतर डीपफेकचा वापर करुन सर्वसामान्य नागरिकांचीही फसवणूक होत आहे. असंच एक नवं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना हाँगकाँगमध्ये घडली आहे (deepfake video conference call).
एका कंपनीला एक व्हिडीओ कॉल आला आणि थोडे थोडके नाही तर तब्बल ₹ 207.6 कोटी कंपनीच्या खातातून लंपास झाले. अशी ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आले होते. त्यानंतर त्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करण्यात आली. जाणून घेऊयात नेमकं घडलंय काय? या प्रकरणात, घोटाळेबाजांनी कंपनीच्या हाँगकाँग शाखेतील कर्मचाऱ्याचा बळी घेण्यासाठी डीपफेकचा वापर केला आहे. यासाठी त्यानं कंपनीच्या चीफ फायनान्स ऑफिसर (CFO) आणि इतर अनेक कर्मचाऱ्यांचे डीपफेक व्हिडीओ तयार केले. यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सामील करण्यात आले. ज्यामध्ये त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं होतं.
या व्हिडीओ कॉलमध्ये पीडित व्यक्ती वगळता सर्व कर्मचारी बनावट होते. म्हणजेच, प्रत्येकाचा डीपफेक अवतार त्या व्हिडीओमध्ये उपस्थित होता. यासाठी घोटाळेबाजांनी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्हिडीओ आणि इतर फुटेजचा वापर केला, जेणेकरून मीटिंगमध्ये उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती खरी वाटली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये एवढा मोठा घोटाळा झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिसांनी कंपनी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती दिलेली नाही. डीपफेक तंत्रज्ञान गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.
जेव्हा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण फोटोसोबत जी माहिती अपलोड करत आहोत, त्यामध्ये मेटा-डेटा हा एक महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये लोकेशन आणि इतर माहिती देखील असते. त्यामुळे ही माहिती तुम्हाला हाइड करावी लागेल कारण ही माहिती डिटेक केली जाते. आपला चेहरा हा फोटोमध्ये आयडेंटिफाय होतो. त्यामुळे आपला डोळा किंवा चेहरा थोडा ब्लर करुन फोटो अपलोड करावा. आपल्याला ही पण गोष्ट लक्ष ठेवावी लागेल की, सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना आपला वॉटर मार्क असलेला फोटोचं अपलोड करावा, ज्यामुळे डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला तर आपल्या प्रोफाइलवरुन खरा शेअर करण्यात आला होता, हे लक्षात येते.
Deepfake CFO tricks Hong Kong biz out of $25 million
Deepfake CFO tricks Hong Kong biz out of $25 million
Deepfake CFO tricks Hong Kong biz out of $25 million
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements