मतीमंद मुलीवर बापाने अत्याचार केल्याचा किळसवाणा प्रकार
बेळगाव—belgavkar : आपल्या देशात वडील आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानले जाते. घरात मुलगी आल्यास लक्ष्मी येते असेही म्हटले जाते. आपल्या मुलीसाठी वडील अनेक कष्ट करतात. पण कधी कधी काही नराधम हे पवित्र नातं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. आपली वासना भागवण्यासाठी स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करण्यासारखे घाणरडे कृत्य केल्याच्या घटना त्यामुळे समोर येतात. आता अशीच काही मनाला चटका लावणारी घटना समोर आली असून, एका बापाने चक्क आपल्याच पोटच्या लेकीवर अत्याचार केला आहे.
मतीमंद मुलीवर बापाने अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही मुलगी गर्भवती होऊन तिला मुलगी झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी संबंधित बापावर गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. बेळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मतिमंद मुलीला आई नाही. ती व तिचे वडील दोघेच घरी राहत होते. या काळात वडिलाने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला.
यातून ही युवती गर्भवती राहिली. ही माहिती गावातील आशा कार्यकर्तीला मिळाली. तिने एका एनजीओला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिने एका बाळाला जन्म दिला. हे कुणी केले माहिती नाही, असेच बाप म्हणत होता; परंतु डीएनए चाचणीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Belgaum abuse by father on mental retarded daughter belgavkar
daughter abused by father in Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements