अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक Video
Rashmika Mandanna Deepfake Video : अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशनचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी याबाबत माहिती दिली आहे (Creator of Rashmika Mandanna deepfake video arrested).
काही महिन्यांपूर्वी रश्मिकाचा एक फेक व्हिडिओ समोर आला होता. जो आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने बनवण्यात आला होता. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली होती आणि कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आलं आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर रश्मिका तसंच फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी चिंता व्यक्त केली होती. याप्रकरणी चिंता व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये ब्रिटिश इन्फ्लुएन्सर झारा पटेल काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लिफ्टमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आरोपीने झाराचा चेहरा एडिट करून रश्मिका मंदानाचा चेहरा लावला होता. या व्हिडिओमध्ये रश्मिकाचा चेहरा झाराच्या चेहऱ्याशी बदलण्यासाठी आरोपींने एआयची मदत घेतली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्य आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आयएफएसओ युनिटचे सीपी हेमंत तिवारी यांनी सांगितले की, 24 वर्षीय आरोपीला आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून अटक करण्यात आली आहे.
Creator of Rashmika Mandanna deepfake video arrested
Creator of Rashmika Mandanna deepfake video arrested
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements