पुढे काय झालं? 2 दारु कंपन्यांमध्ये ट्रेडमार्क उल्लंघन वाद
Chief Justice DY Chandrachud
Chief Justice DY Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत. अनेक ऐतिहासिक आणि महत्वाच्या सुनावणीचा डीवाय चंद्रचूड एक भाग राहीले आहेत. दरम्यान (शुक्रवार) सुनावणी दरम्यान त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन दारु कंपन्यांमध्ये ट्रेडमार्क उल्लंघनाच्या वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती (CJI DY Chandrachud).
दरम्यान, सरन्यायाधीशांसमोर व्हिस्कीच्या दोन बाटल्या सादर करण्यात आल्या. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी या बाटल्या सरन्यायाधीशांसमोर ठेवल्या. डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपीलावर सुनावणी सुरू होती. यामध्ये, इंदूरमध्ये असलेली जेके एंटरप्रायझेस या कंपनीला लंडन प्राईड नावाने शीतपेय बनवण्यापासून रोखण्याचे मद्य कंपनी पेर्नोड रिकार्डचे आवाहन फेटाळण्यात आले होते.
याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. यावेळी दोन बाटल्या CJI आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्यासमोर सादर करण्यात आल्या. यानंतर सरन्यायाधीश मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही बाटल्या आणल्या आहेत? नंतर सरन्यायाधीशांना विचारण्यात आले की ते सादर केलेल्या दोन्ही बाटल्या घेऊन जाऊ शकतो का? यावर सरन्यायाधीशांनी हसत हसत उत्तर दिले की हो कृपया घेऊन जा.
यानंतर रोहतगी यांनी उत्तर दिले की त्यांना दोन्ही उत्पादनांमध्ये साम्य दाखवावे होते. यानंतर त्यांनी या प्रकरणात ट्रेडमार्कचे उल्लंघन कसे झाले हे सांगितले. यानंतर खंडपीठाने या प्रकरणी नोटीस बजावून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. याप्रकरणी आता दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements