Cervical Cancer
आधुनिक जगातील सर्वाधिक भयावह आजारांपैकी एक म्हणजे कर्करोग. महिलांना होणाऱ्या कर्करोगांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक कर्करोगाच्या लक्षणांविषयी माहिती घेऊन त्यानुसार जागरूक राहून आणि नियमितपणे आरोग्य तपासणी करवून घेत असल्यास शरीरात कर्करोग उत्पन्न होत असल्याचे लवकर लक्षात येते आणि त्यावर यशस्वीपणे उपचार केले जाऊ शकतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer / सर्व्हायकल कॅन्सर) हा भारतीय महिलांना होणारा, स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे.कर्करोगाचा हा प्रकार केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांसाठी गंभीर आरोग्य समस्या आहे. आपल्या हटके स्टाईल आणि बोल्डनेसमुळे टिव्ही मनोरंजन क्षेत्रात कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडेचे (Poonam Pande Death) नुकतेच निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे दरवर्षी भारतात अनेक महिलांचा मृत्यू होतो. त्यामुळे, या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे समजून घेणे हे फार महत्वाचे आहे. दुर्दैवाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे ही लवकर ओळखू येत नाही. दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला हा कॅन्सर गेल्यावर याची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात. आज आपण या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत (Cervical cancer is a growth of cells that starts in the cervix. The cervix is the lower part of the uterus that connects to the vagina.).
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लक्षणे
Cervical Cancer : Causes, Symptoms, Prevention and Treatment
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये लघवीला त्रास होणे. तसेच, योनिमार्गातून होणाऱ्या व्हाईट डिसचार्जमध्ये वाढ होणे इत्यादी लक्षणांचा समावेश आहे.
यासोबतच जोडीदारासोबत शारिरीक संबंध ठेवल्यानंतर किंवा मासिक पाळीमध्ये वापरले जाणाऱ्या टॅम्पॉन्सचा वापर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो आणि तीव्र वेदना होतात.
पोटात दुखणे, कंबर आणि पायांमध्ये तीव्र वेदना होणे इत्यादी लक्षण देखील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये सुरूवातीच्या काळात दिसून येतात.
या व्यतिरिक्त रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव हे या कर्करोगाचे प्रमुख आणि महत्वाचे लक्षण आहे. दुर्दैवाने अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात.अशा प्रकारचा त्रास होणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता जवळपास १० टक्के असते. (Cervical Cancer Symptoms)
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील उपचार
या कर्करोगाचे अनेक टप्पे आहेत. त्यामुळे, सुरूवातीच्या टप्प्यात जर तुम्हाला हा कर्करोग ओळखता आला, तर त्यावर उपचार करणे शक्य होते. त्यात ही जर लवकरात लवकर उपचार केले तर हा कर्करोग नियंत्रणात आणला जाऊ शकतो. यासाठी महिलांनी नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या आरोग्याबाबात तुम्हाला योग्य ती काळजी घेता येईल.
पॅप स्मिअर चाचणी : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी ३ वर्षांच्या अंतराने एखाद्या चांगल्या रूग्णालयातून पॅप स्मिअर चाचणी करून घ्यावी. नियमित Pap smear (Pap test) मुळे गर्भाशय ग्रीवामधील कोणतेही असामान्य बदल लवकर ओळखता येतात, ज्यामुळे उपचार लवकरात लवकर सुरू होऊ शकतात.
लसीकरण करणे : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी आणि या आजाराचा विषाणू HPV पासून संरक्षण करण्यासाठी यावर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुली आणि महिलांनी नियमित तपासणी आणि लसीकरण केले पाहिजे. एचपीव्ही लसीकरण गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.
Cervical Cancer : Causes, Symptoms, Prevention and Treatment
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य आवश्यक जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. हे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात, जे HPV सारख्या संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक आहे.
धूम्रपान सोडल्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा विकास रोखता येतो. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि इतर कर्करोग होण्याची शक्यताही कमी होते.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळा. या बदलांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
लठ्ठपणा इतर आरोग्य समस्यांसह गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवा.
योग आणि ध्यान करून तणाव कमी करा. दीर्घकाळापर्यंत तणावामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. पण योग आणि ध्यान यांसारख्या क्रियाकलापांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements