१४ हजारात दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन, पण.. (BTS Group)
BTS
BTS Band : 3 minor girls Left home to watch BTS perform : दक्षिण कोरियाचा बीटीएस हा म्युझिक बँड जगभरात चांगलाच लोकप्रिय आहे (BTS also known as the Bangtan Boys, is a South Korean boy band). विशेषतः तरूणांमध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळालेली असून बीटीएसच्या गाण्यांनी तरूण पिढीवर अक्षरशः गारूड घातले आहे. बीटीएसमधील गायकांना भेटण्यासाठी जगभरातील चाहते आतूर असतात. तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील तीन अल्पवयीन मुलीही बीटीएसच्या चाहत्या आहेत. त्यांनी बँडमधली तरुणांना भेटण्यासाठी एक अजब शक्कल लढविली.
दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला पोहोचण्यासाठी या मुलींनी महिन्याभरापूर्वी नियोजन केले. प्रवासासाठी १४000 रुपये गोळा केले आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे प्रवास सुरू केला. मात्र त्याआधीच त्यांचे स्वप्न भंगले आणि पोलिसांनी त्यांची सुटका केली. तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील या तीनही मुलींचे वय १३ वर्ष असल्याचे बातमीत म्हटले आहे. आपल्या गावातून चेन्नई आणि मग चेन्नईतून ट्रेनच्या माध्यमातून विशाखापट्टनमला पोहोचायचे. तिथून समुद्रामार्गे दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला प्रवास करायचा असा प्लॅन या मुलींनी तयार केला होता. हजारो किलोमीटर दूर असलेल्या संगीत विश्वातील आपल्या प्रेरणास्त्रोत्रांना भेटण्यासाठी या मुलींनी ही असाध्य अशी मोहीम आखली. मात्र या मुलींचे हे स्वप्न पुर्ण होऊ शकले नाही.
चेन्नईला पोहोचल्यानंतर वेल्लोर जिल्ह्यातील काटपाडी रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी त्यांची सुटका केली. यावेळी या मुली घरी परतण्याच्या विचारात होत्या, असे सांगितले जाते. पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे समुपदेशन करून त्यांच्या प्रवासाच्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी मुलींनी सांगितले की, त्या विशाखापट्टनम येथून बोटीने सेऊलला जाणार होत्या. हा मार्ग त्यांनी इंटरनेटवरून शोधला होता.
या मुलींना सध्या वेल्लोर जिल्ह्यातील सरकारी बालगृहात ठेवले आहे. त्यांचे पालक त्यांना घ्यायला येईपर्यंत पोलिसांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. “या तीनही मुली निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. एका मुलीची आई ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. दुसऱ्या मुलीचे वडील दिव्यांग आहेत, तर तिसऱ्या मुलीचे पालक शेतमजूर असून ते एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. पण या तीनही मुलींकडे स्मार्टफोन आहे. मोबाइलच्या माध्यमातूनच या मुलींना बीटीएस बँडला भेटण्याची आतुरता निर्माण झाली”, अशी माहिती वेल्लोर जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष पी. वेदनारायण यांनी मुलींशी बोलल्यानंतर दिली.
समुपदेशनादरम्यान या मुलींनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या मित्रांकडून त्यांना बीटीएस बँड बद्दल कळले. त्यानंतर त्यांचे संगीत मुलींना इतके भावले की, त्यांनी गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने कोरियन गाणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलींना बीटीएसचा नामविस्तारही माहीत होता. वेदनारायण यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, या बँडमधील सातही मुलांचे नाव या मुलींना माहीत होते. एवढेच नाही तर त्यांच्या आवडी-निवडी, आवडते अन्नपदार्थ, आवडते कपडे या सर्वांची माहिती या मुलींना होती.
या मुलींनी ४ जानेवारी रोजी घर सोडले होते. इरोड रेल्वे स्थानकातून चेन्नईसाठी ट्रेन पकडली. चेन्नईत पोहोचल्यानंतर त्यांनी रात्रीचा मुक्काम करायचे ठरविले. यासाठी हॉटेलमध्ये राहण्यासाठी खोली शोधली. एका हॉटेलमध्ये १२०० रुपये एका रात्रीचे भाडे देऊन त्यांनी मुक्काम केला, अशीही माहिती वेदनारायण यांनी दिली. दरम्यान इकडे त्यांच्या मुळ गावी, कुटुंबियांच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे हलविली. व्हॉट्सअप ग्रुपमधून मुलींचे फोटो प्रसारित करण्यात आले. तसेच सीसीटीव्ही चित्रणही तपासले. चेन्नईमध्ये पोहोचलेल्या या मुलींनी दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेन पकडली. काटपाडी रेल्वे स्थानकात जेवण घेण्यासाठी त्या फलाटावर उतरल्या होत्या. पण जेवण घेत असताना त्यांची ट्रेन सुटली. काटपाडी रेल्वे पोलिसांच्या नजरेस या मुली पडल्या. त्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर करूर जिल्ह्यातील पोलिसांना याची माहिती दिली आणि वेल्लोर जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे तीनही मुलींची रवानगी केली. वेदनारायण यांनी सांगितले की, या तीनही मुलीनी दक्षिण कोरियाला जाण्यासाठी १४ हजार रुपये गोळा केले होते. दोन दिवसाच्या प्रवासानंतर त्यातील फक्त आठ हजार रुपये त्यांच्याकडे उरले. त्यामुळे एवढ्या पैशात आपण दक्षिण कोरियाला पोहोचणार नाही, याची त्यांना कल्पना आली होती. आपण असे धाडस पुन्हा करणार नाही, अशी कबुली तीनही मुलींनी दिली.
‘BTS Band’ ला भेटण्यासाठी 3 अल्पवयीन मुलींनी घर सोडलं;
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements