काय आहे कारण? #Lakshadweep #Maldives
Lakshadweep भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ
Boycott Maldives Trend : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. लक्षद्वीपमध्ये काढण्यात आलेले मोदींचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर या फोटोंची आणि लक्षद्वीपची सर्वत्र चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. पर्यटन स्थळांच्या बाबतीत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याची चर्चा देखील सुरू झाली (Lakshadweep vs Maldives). मात्र लक्षद्वीपला अधिक पर्यटक आल्यास त्याचा थेट परिणाम मालदीववर होण्याची शक्यता आहे. यादरम्यान एका मालदीवच्या नेत्याने केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.
Lakshadweep is a tropical archipelago of 36 atolls and coral reefs in the Laccadive Sea, off the coast of Kerala, India. India’s smallest Union Territory Lakshadweep is an archipelago consisting of 36 islands with an area of 32 sq km. निसर्ग सौंदर्याने नटलेलं लक्षद्वीप एक सुंदर, रोमॅंटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. मालदीव प्रमाणे अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात. कल्पेनी बेट, कदमत बेट, अगत्ती बेट, बांगरम बेट ही लक्षद्वीप मधील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. लक्षद्वीप 8 किमी परिसरात पसरलेला आहे. इथली लोकसंख्या 8 हजारच्या आसपास आहे. भारतापासून सुमारे 300 किमी अंतरावर अरबी समुद्रात लक्षद्वीप हे बेट आहे. लक्षद्वीप हा भारताचा एक छोटा केंद्रशासित प्रदेश
Maldives officially the Republic of Maldives is an archipelagic state and country in South Asia, situated in the Indian Ocean. The Maldives is a nation of islands in the Indian Ocean, that spans across the equator. The country is comprised of 1192 islands
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या दौऱ्याने मालदीवमधील काही नेत्यांना झटका लागल्याचे पाहायला मिळाले. मालदीवचा सत्ताधारी पक्ष प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नेते जाहिद रमीझ यांनी भारतीयांची खिल्ली उडवणारी पोस्ट सोशल मीडियाव प्लॅटफॉर्म एक्सवर केली. याचा परिणाम म्हणून सोशल मीडियावर बायकॉट मालदीव ट्रेंड करू लागलं आहे.
नेमकं झालं काय? : पीएम मोदींनी 4 जानेवारीला लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले होते. एक्स युजर सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, “किती उत्तम पाऊल आहे! मालदीवमधील नव्या चीनचं पपेट असलेल्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. यामुळे लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना मिळेल.”
सिन्हा यांच्या पोस्टला उत्तर देताना जाहिद रमीझ यांनी लिहिले, “हे पाऊल खूप चांगले आहे. मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना दिशाभूल करणारी आहे. ते (भारतीय) आम्ही देत असलेली सेवा कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये येणारा वास हे सर्वात मोठं पतन असेल.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक एक्स यूजर्सनी जाहिद रमीज यांच्यावर वर्णद्वेषी वक्तव्य केल्याचा आरोप केला. तसेच अनेक युजर्सनी संताप देखील व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर Boycott Maldives देखील ट्रेंड करत आहे. लोक मालदीववर बहिष्कार टाकण्याबद्दल आणि लक्षद्वीपला (Lakshadweep) पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्याबद्दल लिहीत आहेत.
मालदीवमध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नुकतीच सत्तेवर आली आहे. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव करून डॉ.मोहम्मद मुइज्जू अध्यक्ष बनले आहेत. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला होता. याउलट मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मालदीवचे भारताशी संबंध बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. मुइज्जूने भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.
Lakshdeep
Maldives
Boycott Maldives Trend
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements