Ayodhya Ram Mandir
Beware of online Ram Mandir Darshan scam
अयोध्या : अयोध्येत सोमवारी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही ठगांकडून बनावट लिंक तयार करण्यात आलेल्या आहेत. या लिंकमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यासंदर्भात गृह मंत्रालयानेही अलर्ट दिलेला आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावावर सायबर गुन्हेगार बनावट लिंक देऊन फसवणूक करु शकतात (Beware! That link on your WhatsApp for Ram Temple event live telecast may be fake).
Beware of online Ram Mandir Darshan scam
त्यामुळे तुम्हाला WhatsApp मेसेज आल्यानंतर त्या लिंकसंदर्भात खात्री करणं गरजेचं आहे. ‘एका क्लिकवर पाहा राम मंदिर सोहळा लाईव्ह’ असा बनावट मेसेज येण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, MHA सायबर विंगने एक अलर्ट जारी केला असून सायबर विभागाला तशा फेक लिंकची माहिती मिळाली आहे. यामध्ये गुन्हेगार चुना लावण्यासाठी WhatsAppवर फेक लिंक पाठवत आहेत.
राम मंदिर सोहळ्याची लाईव्ह स्टीमिंग बघण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलमधील सेन्सेटिव्ह डेटा चोरी होऊ शकतो. तसेच बँक अकाऊंट अप्लिकेशन किंवा वॉलेट App हॅक होऊ शकतं. त्यानंतर अकाऊंटवरील पैसे झीरो होऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने कुणाची फसवणूक झालीच तर सायबर हेल्पलाईन नंबर 1930 वर कॉल करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे प्रकरण नोंद होईल आणि पुढे तपास होऊ शकेल. मोबाईलधारकांनी अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करणं टाळावं. एखाद्या ओळखीतल्याने जरी लिंक पाठवली तरी त्याची खातरजमा केल्याशिवाय लिंकवर क्लिक करु नये.
Beware of online Ram Mandir Darshan scam
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements