समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव—belgavkar : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना राज्य सरकारकडून या भागात कन्नडसक्ती लागू करण्यात येत आहे. कन्नड संघटनांकडून मराठी फलक काढण्यास व्यापाऱ्यांना, नागरिकांना धमकाविले जात आहे. हे प्रकार त्वरित थांबविण्यात यावेत, संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, 15 दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सीमाभागामध्ये अशा कोणत्याच प्रकारचा कायदा लागू करणे चुकीचे आहे. व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर लावण्यात आलेल्या फलकांवर 60 टक्के कन्नडची सक्ती करणे चुकीचे आहे. वाद न्यायालयात असताना या भागातील जनतेवर लादण्यात येणारी कन्नडची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी सरकारने याची जाणीव ठेऊन हा कायदा मागे घ्यावा, सीमाप्रश्नाचा निकाल लागल्यानंतरच याचा निर्णय घेण्यात यावा. मनपा आयुक्तांनी व्यापाऱ्यांना नोटीस जारी केली आहे.
असे प्रकार थांबविण्यात यावेत, यावर येत्या 15 दिवसांत कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा प्रशासनाने कोणतीच ठोस भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे देण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुस्कर, मदन बामणे, नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, मनोज पावशे, बी. डी. मोहनगेकर, आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर, राजाभाऊ पाटील. एम. जी. पाटील यांच्यासह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum mes protest kannada in hoardings belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements