छत्रपती शंभूराजांचा 343 वा राज्याभिषेक सोहळा
बेळगाव—belgavkar : स्वराज्य आणि धर्मनिष्ठा जोपासुन शुरवीर संभाजीराजेंनी मुघल साम्राज्याशी कडवी झुंज देत 120 युद्ध खेळून ती जिंकली आणि मराठेशाहीचे अस्तित्व अबाधीत ठेवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे स्वराज्य घडविण्यात मोलाचे योगदान दिले असे प्रतिपादन भाजपाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी केले. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या वतीने धर्मवीर संभाजीराजेंचा राज्याभिषेक दिन सोमवारी सकाळी साजरा करण्यांत आला.
प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिपूर्वक पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले शुरवीर संभाजीराजे यांना वयाच्या अवघ्या नवव्यावर्षी छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेचा थरार अनुभवयाला मिळाला. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या चौदाव्यावर्षी त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहीला होता. केशवभट आणि उमाजी पंडीतांच्या तालमीत त्यांचे शिक्षण झाले. परकीय लेखकांनीही त्यांच्या युद्धनितीची वाहवा केली. गागाभट यांच्याकरवी त्यांनी नितीमुल्यांची शिकवण देणारा समयनय ग्रंथ लिहून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजानंतर संभाजीराजेंनी चिंचवड, मोरगांव गणपती, सज्जनगड, चाफल, हिंगणवाडी आदि देवस्थानांची देखभाल करत धर्म जोपासण्यांचे महान काम केले असे ते म्हणाले. याप्रसंगी धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, श्रीनाथ पवार, प्रमोद कंग्राळकर, निशांत कुडे, श्रवण जुटे, मंथन कामुले, सुमित पाटील, प्रसाद पवार, ऋषभ मोहिते, निखिल पाटील, महेश सोनदी, प्रथमेश किल्लेकर, ओंकार मोहिते, आकाश कुकडोलकर, प्रसाद मोरे, ओमकार पुजारी, कुंज नावगेकर, ओमकार भोसले, युवराज भोसले, सुशांत तरहळेकर, वैभव, संभाजी महाराज सुशोभीकरण समितीचे सदस्य, महिला-भगिनी, युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Sambhaji Maharaj Chowk Rajyabhishek belgav belagavi belgavkar
Belgaum Sambhaji Maharaj Chowk Rajyabhishek
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements