चिक्कोडी बायपास ते गोटूरपर्यंतच्या रस्ता सुधारणा काम
बेळगाव—belgavkar : बेळगावच्या बहुचर्चित रिंगरोडचा कोनशिला समारंभ गुरुवारी (ता. 22) होणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण होणार आहे. रिंगरोडविरोधात बेळगाव तालुक्यातील 51 शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळविली आहे; पण लोकसभा निवडणुकीच्या आधी रिंगरोडच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे.
22 रोजी दुपारी 12 वाजता येथील जिल्हा क्रीडांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी ही माहिती दिली आहे. बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील 376 किमी लांबीच्या महामार्गासाठी 6975 कोटींच्या कामाचा प्रारंभही मंत्री गडकरी करतील. बेळगाव, कारवार, विजापूर, बागलकोट, कोप्पळ, रायचूर, बिदर व गुलबर्गा जिल्ह्यातील कामांचा यात समावेश आहे. बेळगावचा नियोजित रिंगरोड 34.48 किमी लांबीचा आहे. या रिंगरोडसाठी ₹ 1622 कोटी निधी खर्च केला जाणार आहे. या रिंगरोडसाठी बेळगाव तालुक्यातील 31 गावांमधील 1272 एकर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यामुळे या रिंगरोडला तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. झाडशहापूर या एकाच गावातील सुमारे शंभर एकर जमिनीचे संपादन यासाठी केले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वाधिक फटका झाडशहापूर या गावाला बसणार आहे, पण या रिंगरोडविरोधात एवढ्या मोठ्या संख्येने याचिका दाखल करून स्थगिती मिळविली असताना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते या कामाची कोनशिला उभारली जात आहे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ‘548 बी’चा भाग असलेल्या चिक्कोडी बायपास ते गोटूरपर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणा कामाचाही समावेश यात आहे. 27.12 किमी लांबीच्या या रस्त्यासाठी 941 कोटी 61 लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. शिरगुप्पी ते अंकलीपर्यंतच्या 10 किमी लांबीच्या रस्त्याच्या सुधारणा कामाचाही यात समावेश आहे. या कामासाठी 887 कोटी 32 लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय मुरगुंडी ते चिक्कोडी या 50 किमी रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. त्यासाठी 785 कोटी 79 लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील एकूण 122 किमी लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल 4237 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. सहा जिल्ह्यांतील कामांना चालना कारवार जिल्ह्यातील अरेबैल ते इडगुंदी या 16 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचाही यात समावेश आहे. त्या कामासाठी 31 कोटी 9 लाख रुपये निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय विजापूर, बागलकोट, कोप्पळ, रायचूर, बिदर, गुलबर्गा येथील महामार्ग सुधारणा कामांचाही समावेश आहे.
Belgaum Ringroad Nitin Gadkari Opening work belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Ringroad Nitin Gadkari Opening work
Belgaum Ringroad Nitin Gadkari Opening work
Belgaum Ringroad Nitin Gadkari Opening work
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements