बेळगाव—belgavkar : रायबाग : विवाहित महिलेसह तिच्या लहान मुलांचा मृतदेह विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायबाग तालुक्यातील पालभावी येथील विवाहित महिलेने आपल्या दोन्ही मुलींना पाठीला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुलतानपूर गावच्या हद्दीत सकाळी 11 वाजता सरस्वती नितीन किरवे (वय 26) हिने आपल्या मुली दीपिका (7) आणि रितिका (4) यांच्यासह विहिरीत उडी घेतली.
याबाबतची अधिक माहिती अशी : 2016 मध्ये रायबाग तालुक्यातील सुलतानपूर गावातील सरस्वती हिचा विवाह महाराष्ट्रातील सांगली शहरातील नितीन किरवे याच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुली. सरस्वती ही सासरच्या जाचाला कंटाळून मागील आठ महिन्यांपासून आपल्सा माहेरी सुलतानपूर गावात मुलींसह राहत होती. पती आणि सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून सरस्वती हिने आत्महत्या केल्याचे समजते.
पतीने पत्नी आणि मुलांना पाहण्यासाठी एक दिवसही घरी येण्याचा प्रयत्न केला नाही. तो वारंवार फोन करून त्रास देत असे. यामुळे वैतागून तिने मुलांसह आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. हारुगेरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Raibag Sultanpur Woman Suicide belgav belagavi belgavkar
Belgaum Raibag Sultanpur Woman Suicide
Belgaum Raibag Sultanpur Woman Suicide
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements