बेळगाव—belgavkar : बेळगावमधून पुण्याला विमानसेवा पूर्ववत करा, अशी मागील अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. परंतु, बेळगावला वगळून येत्या 2 फेब्रुवारीपासून पुणे-हुबळी मार्गावर विमानफेरी सुरू होत आहे. यामुळे इंडिगो एअरलाईन्सने बेळगावला पुन्हा एकदा डावलल्याचे स्पष्ट होत आहे.
बेळगावमधील हजारो नागरिक पुणे येथे नोकरी, व्यवसायासाठी स्थायिक आहेत. त्यामुळे त्यांची बेळगावला ये-जा असते. लॉकडाऊनपूर्वी अलायन्स एअर कंपनीकडून बेळगाव-पुणे मार्गावर विमानफेरी सुरू होती. या विमानफेरीला तुफान प्रतिसाद मिळत होता. अवघ्या एक तासामध्ये बेळगावमधून पुण्याला पोहोचता येत होते. परंतु, तांत्रिक कारणाने अलायन्स एअरने विमानसेवा बंद केली.
बेळगावमध्ये अनेक लहानमोठे उद्योग असून त्यांची कॉर्पोरेट कार्यालये पुणे येथे आहेत. हुबळीपेक्षा बेळगावला विमानफेरीची गरज आहे. परंतु, बेळगावला वगळून पुणे-हुबळी मार्गावर विमानफेरी सुरू करण्यात येत आहे. बेळगावसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या बेळगाव-पुणे व बेळगाव-नाशिक या विमानफेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी बेळगाव-पुणे मार्गावर विमानफेरी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
Belgaum Pune Flight Service by Hubbali belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Belgaum Pune Flight Service by Hubbali
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements